Sharad Pawar News: शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, पक्ष बांधणीसाठी उद्यापासून बैठकांचा धडका

NCP Political Crisis: राष्ट्रवादीत बंड करून वेगळा गट स्थापन केल्यानंतर अजित पवार युती सरकारमध्ये सामील झाले. तर शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील गट अधिक आक्रमक होऊन महाराष्ट्र दौरा करत आहे.
Sharad Pawar
Sharad Pawarsaam tv

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार राज्यातील विविध भागात दौरे करून पक्ष बळकट कऱण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळ विस्तारात सत्तेतील तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे.

राष्ट्रवादीत बंड करून वेगळा गट स्थापन केल्यानंतर अजित पवार युती सरकारमध्ये सामील झाले. तर शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील गट अधिक आक्रमक होऊन महाराष्ट्र दौरा करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा उद्यापासून बैठकाचा धडाका असणार आहे. पहिली बैठक उद्या त्र्यंबकेश्वरमध्ये होणार आहे.

Sharad Pawar
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप रखडण्यामागं काय आहेत कारणं? दिल्ली दरबारी सुटणार तिढा

शरद पवार त्र्यंबकेश्वरचे दर्शन देऊन पक्ष बांधणीच्या कामाला सुरुवात करणार आहेत. त्र्यंबकेश्वरनंतर पेठ, हरसूल, सुरगाणा, कळवण अशा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शरद पवार बैठका घेणार आहेत. (Tajya Marathi Batmya)

राष्ट्रवादीमध्ये सध्या कोण कोणाच्या बाजूने आहे, याचा सर्व्हे सुरू आहे. शरद पवार यांच्यासोबत जे आहेत त्यांची तालुकानिहाय यादी केली जात आहे. तसेच पवारांच्या सूचनेनंतर पदाधिकारी पक्षबांधणीच्या कामाला लागले आहेत. विधानसभा मतदारसंघ निहाय पदाधिकारी नेमणूक करण्याच्या सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत. (Latest Political News)

Sharad Pawar
Uday Samant News: ठाकरे गटातील आणखी ४ आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार, मंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

येवल्यातील शरद पवारांच्या सभेनंतर पवार गटाचा आत्मविश्वास वाढला आहे. पवारांना युवकांना जास्तीत जास्त पाठिंबा दिसत आहे. युवा वर्ग पवारांकडे आकर्षित होत असून त्यावर जास्त लक्ष केंद्रीत करण्याच्या आणि त्याचे मतदानात रूपांतर करण्यासाठी काम करण्याच्या सूचना पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना मुबंईत बोलावून सूचना करण्यात आल्या आहेत. येवल्यातील सभेनंतर मुबंईतून नाशिक जिल्ह्याची रणनीती आखली जात आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com