Uday Samant News: ठाकरे गटातील आणखी ४ आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार, मंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

ठाकरे गटातील आणखी चार आमदार शिंदे गटात प्रवेश करणार आहे, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
Uday Samant
Uday Samantsaam tv

अमर घटारे

Amravati News: ठाकरे गटाचे एकामागोमाग एक शिलेदार शिंदे गटात प्रवेश करत आहे. ठाकरे गटाला शिंदेंच्या बंडापासून लागलेली गळती सुरूच असलेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मनिषा कायंदे आणि त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता ठाकरे गटातील आणखी चार आमदार शिंदे गटात प्रवेश करणार आहे, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. (Latest Marathi News)

मंत्री उदय सामंत सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मंत्री उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. उदय सामंत यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे .

Uday Samant
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप रखडण्यामागं काय आहेत कारणं? दिल्ली दरबारी सुटणार तिढा

दोन महिन्यांपूर्वी उदय सामंत यांनी सांगितलं होतं की, ठाकरे गटातील सहा आमदार शिवसेना शिंदे गटात येणार आहे. त्यापैकी आता दोन आमदार शिंदे गटात आले आहेत. ठाकरे गटाचे आणखी चार आमदार आमच्या संपर्कात आहे. ठाकरे गटाचे चारही आमदार वेळेवर येतील, असा दावा सामंत यांनी केला आहे.

ठाकरे गटाच्या दाव्यावर मंत्री सामंत म्हणाले, 'ठाकरे गटाला सहानभूती मिळावी व स्वतःच्या गटातील लोक स्वतःच्या ताब्यात राहावी, यासाठी शिंदे गटाचे आमदार आमच्या संपर्कात आहे, असं बोललं जात आहे, अशी टीका सामंत यांनी केली आहे.

Uday Samant
CM Eknath Shinde On Uddhav Thackeray: 'कलंक' वक्तव्यावरील वादात CM एकनाथ शिंदेंची उडी; बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना सुनावले

दरम्यान, अजित पवार यांच्याकडे असलेली राष्ट्रवादीच्या प्रचाराची जबाबदारी अमोल कोल्हे यांच्याकडे देण्यात आली आहे. यावरून उदय सामंत यांनी टीका केली आहे.

सामंत म्हणाले, 'अजितदादांचा आवाका किती आहे, ज्यांच्यावर जबाबदारी दिली त्यांचा आवाका किती? अजितदादा हे दादा आहेत. त्यामुळे तडजोड म्हणून कोणाला जबाबदारी दिली, त्याच्या फरक दादांच्या नेतृत्वांवर आणि कर्तुत्वावर पडणार नाही'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com