Bacchu Kadu News Saam Tv
महाराष्ट्र

Bacchu Kadu News : ...तर मनोज जरांगेंसोबत आंदोलनात सहभागी होऊ आणि सरकारला घेरु; बच्चू कडू यांचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil Andolan for maratha reservation : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी दोन महिन्यांचा वेळ दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Amravati News :

 मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी दोन महिन्यांचा वेळ दिला आहे. मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारमध्ये मध्यस्थी करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. मात्र सरकारने दगा फटका केला तर रस्त्यावर उतरु असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला आहे.

बच्चू कडू यांनी याबाबत म्हटलं की, कालच्या यशस्वी मध्यस्थीचं यश हे जरांगे पाटील आणि मराठ्यांचं आहे. गेली १६ वर्ष मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत. त्यासाठी जमीनही विकली. मनोज जरांगे पाटील यांनी प्रकृती सततच्या उपोषणामुळे खालावली होती. त्यामुळे मध्यस्थी करणे गरजेचं होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माझा एक कार्यकर्ता म्हणून रोल होता. आता जो तारखेचा घोळ होत आहे तो महत्त्वाचा नाही. तारीख जाहीर करताना मी स्वत: मनोज जरांगे-पाटील यांच्याशी बोललो होतो. तीन महिने वेळ द्यावा अशी मागणी केली होती. पण लोकसभेच्या आचारसंहितेच्या आत हा प्रश्न मिटला पाहिजे, असं आम्हाला वाटलं, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.

२४ डिसेंबर तारीख समजूनच काम करावं

मनोज जरांगे पाटील २४ डिसेंबर तारीख म्हणत आहे सरकार २ जानेवारी म्हणत आहे. मात्र दिवाळीच्या आठ ते दहा दिवस सुट्ट्या, शनिवार रविवार अशा सुट्ट्या देखील या दरम्यान आहे. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होईल. सरकारने २४ तारीख समजूनच काम केलं पाहिजे तर ते लगेच होईल, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं.

...तर आम्ही सरकारला घेरू

यानंतर सरकारने दगा फटका केला तर आम्ही पूर्ण मराठ्यांसोबत उभे राहू. पूर्ण ताकतीने आंदोलनात सहभागी होऊ व सरकारला घेरु, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला. मी जर मध्यस्थी केली आहे तर मला त्याचे परिणाम भोगावे लागतील. मी एक कार्यकर्ता म्हणून गेलो होतो, सरकारचा प्रतिनिधी म्हणून गेलो नव्हतो. मात्र जरांगेची प्रकृती पाहून सरकार आणि जरांगेची मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT