bacchu kadu criticizes navneet rana and bjp in achalpur  saam tv
महाराष्ट्र

Bacchu Kadu : आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर तुमचं काय जमलं असतं? राणांचा उल्लेख टाळत बच्चू कडूंनी पुन्हा भाजपला डिवचलं

सरकार तर वरती आणि खालती आहे भाऊ! भगव्या वाल्याचे असे म्हणत आमदार बच्चू कडू यांनी जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम करायला लागते असेही नमूद केले.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News :

आम्ही जर गुवाहाटीला (guwahati) गेलो नसतो तर तुमचं काय जमलं असतं? आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आलात असा टाेला आमदार बच्चू कडू (bacchu kadu latest marathi news) यांनी अप्रत्यक्षरित्या खासदार नवनीत राणा (mla navneet rana) यांना लगावला आहे. आमदार बच्चू कडू हे अचलपूर मतदार संघातील विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात बाेलत हाेते.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमदार बच्चू कडू म्हणाले आजपर्यत या मतदारसंघात कोणी एवढा निधी आणला का ? काही लोक म्हणतात आम्ही निधी आणला. आमचीच सरकार आहे. भाजपवाले (bjp) तर बाहेर बसले होते. आम्ही भाजपवाल्यांना सत्तेत आणलं. आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर तुमचं काय जमलं असतं? आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आले. (Maharashtra News)

बच्चू कडू पुढे बाेलताना म्हणाले दीड वर्षात सर्वांच्या सहकार्याने मतदारसंघाचा कायापालट करीत आहाेत. गावात देखील विविध याेजना आणल्या. त्यामुळे नागरिकांचा फायदा हाेत आहे. काहींनी अद्याप याेजनांचा फायदा घेतला नाही. त्यांनी याेग्य कागपदत्रं काढून याेजनांचा फायदा घ्यावा. सरकार तर वरती आणि खालती आहे भाऊ! भगव्या वाल्याचे आहे. जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम करायला लागते असेही आमदार कडू यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

SCROLL FOR NEXT