bacchu kadu, Gram Panchayat Elections 2022, amravati  saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Elections 2022 : चर्चा तर हाेणारच ! 'ग्रामपंचायती' त काॅंग्रेसचे बच्चू कडूंपुढे आव्हान

आता निवडणुकीच्या निकालानंतर कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Gram Panchayat Elections 2022 : राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील बेलोरा ग्रामपंचायतकडे सर्वांचे लक्ष लागल आहे. यंदा माजी राज्यमंत्री व शिंदे फडणवीस सरकारमधील आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार ग्रामविकास पॅनलमधून त्यांचे भाऊ भैय्या कडू हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांना काॅंग्रेसच्या पॅनेलची टक्कर असणार आहे. (Maharashtra News)

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बच्चू कडू यांच्या भावाने उतरणे निवडणूक लढवणे म्हणजे राजकारणात काहीतरी वेगळेपण आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेस समर्पित परिवर्तन पॅनलचे दत्ता उर्फ रामेश्वर विधाते हे रिंगणात आहेत. विधाते यांच्या म्हणण्यानुसार ही लढाई धनशक्ती विरोध जनशक्तीची आहे. (Bacchu Kadu Latest Marathi News)

भैय्या कडू यांचे म्हणणे आहे मी भाऊचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. गावकऱ्यांनी या निवडणुकीत (election) लढण्यास सांगितले आणि भाऊची अनुमती घेतल्यानंतर मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. दरम्यान बेलोरा गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये (grampanchayat) बच्चू कडू आणि काँग्रेसचे बबलू देशमुख यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आता निवडणुकीच्या निकालानंतर कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT