मोठी बातमी! Jalna: महिला व बाल रुग्णालयातून चक्क बाळाची चोरी  लक्ष्मण सोळुंखे
महाराष्ट्र

मोठी बातमी! Jalna: महिला व बाल रुग्णालयातून चक्क बाळाची चोरी

एका महिलेने बाळाची चोरी केल्याचा नातेवाईकांचा आरोप

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना: जालन्याच्या (Jalna) शासकीय महिला व बाल रुग्णालयातून (hospital) रात्री जन्मलेल्या बाळाची चोरी (Theft) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुकसाना अहेमद या महिलेने काल प्रसूतीसाठी महिला व बाल रुग्णालयात (Women and Children Hospital) दाखल करण्यात आले होते. रात्रीच्या ११ वाजेच्या सुमारास या महिलेने गोडस अशा मुलाला जन्म दिला होता.

हे देखील पहा-

सकाळी (morning) एका महिलेने बाळाला गरम पाण्याने आंघोळ घालण्यासाठी पाणी देते, म्हणून रुकसाना या महिलेच्या जावाला रुग्णालयात (hospital) पाणी आणून बाळाला आंघोळ घातली. रुकसाना यांची जावू बाहेर जाताच या महिलेने बाळाला घेऊन पोबारा केल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कदीम जालना पोलिसांनी (Police) धाव घेऊन या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून हा तपास सुरु करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेने शासकीय महिला व बाल रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. वार्डातून बाळाची चोरी झाल्याने रुग्णालय परिसराच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chest congestion: छातीत घट्ट पिवळा कफ साचलाय? हे 7 घरगुती उपाय करून पाहा, लगेच सैल होईल कफ

Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! ट्रकला धडकून पिकअपचा चेंदामेंदा; ६ भाविकांचा मृत्यू, १४ गंभीर जखमी

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, वैद्यकीय तपासणीला नकार; अंतरवाली सराटीत नेमकं काय घडतंय?

Lek Ladki Yojana : मुलींसाठी सरकारची मोठी योजना! ₹1.01 लाख थेट मदत; फक्त या कुटुंबांनाच मिळणार लाभ

Maharashtra News Live Update: गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध

SCROLL FOR NEXT