Anil Parab: परिवहन मंत्री अनिल परबांच्या घराबाहेर 1800 प्रशिक्षणार्थ्यांचे आंदोलन; पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे येथील घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
Anil Parab: परिवहन मंत्री अनिल परबांच्या घराबाहेर 1800 प्रशिक्षणार्थ्यांचे आंदोलन; पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
Anil Parab: परिवहन मंत्री अनिल परबांच्या घराबाहेर 1800 प्रशिक्षणार्थ्यांचे आंदोलन; पोलिसांचा बंदोबस्त वाढवलाSaam Tv
Published On

मुंबई: परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab)यांच्या वांद्रे (Bandra) येथील घराबाहेर पोलिसांचा (police) मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंग (Barricading) करण्यात आले आहे. पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले आहे. २०१९ साली काही उमेदवारांची प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, त्यांना महामंडळाने आजून देखील नियुक्ती दिली नाही. अशातच या १८०० आंदोलकांकडून त्वरीत कामावर घेण्याची मागणी केली जात आहे. त्याकरिता या प्रशिक्षणार्थ्यांकडून (Trainees) आज आंदोलन केले जात आहे. (1800 trainees protest outside Transport Minister Anil Parab house)

हे देखील पहा-

एसटी (ST) महामंडळाकडून २०१९ ला प्रक्रिया पूर्ण करुन देखील प्रशिक्षणार्थ्यांना भरती करण्यात आले होते. मात्र, तरी देखील त्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. १८०० प्रशिक्षणार्थी आंदोलकांकडून कामावर घेण्याची मागणी केली जात आहे. या आंदोलकांमध्ये चालक, वाहक, सहाय्यक, टेक्निशियन्सचा समावेश करण्यात आला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्रेमधील घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Anil Parab: परिवहन मंत्री अनिल परबांच्या घराबाहेर 1800 प्रशिक्षणार्थ्यांचे आंदोलन; पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
Increase in the price of vegetables: भाज्यांचे दर कडाडले, सर्वसामान्यांच्या बजेटला कात्री

जागोजागी प्रशिक्षणार्थी आंदोलकांकडून मोर्चाची तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीकरिता पुकारलेला संप अजून देखील संपला नाही. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करायचे की नाही याविषयीचा अहवाल २ दिवसांत येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परबांनीच तशी माहिती दिली आहे. मालेगाव (Malegaon) मधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणी संदर्भात अहवाल तयार करण्याकरिता त्रिस्तरीय समिती नियुक्त केली आहे. या समितीच्या अहवालावर राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचे अनिल परबांनी स्पष्ट केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com