Baba Siddique Death:  Saamtv
महाराष्ट्र

Baba Siddique Death: चार आरोपी, २ लाखांची सुपारी अन् पंजाब कनेक्शन, असा शिजला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; वाचा इनसाईड स्टोरी

Gangappa Pujari

Baba Siddique Death Inside Story: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. झिशान सिद्दीकी यांचे कार्यालय असलेल्या वांद्रा परिसरात बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाला, ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर आणखी एकाचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना झाली आहेत. या हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासे होत असून २ लाखांची सुपारी घेऊन ही भयंकर हत्या करण्यात आल्याचे आता समोर आले आहे.

असा रचला हत्येचा कट..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात एकापाठोपाठ एक नवे खुलासे होत आहेत. या हत्येचा संपूर्ण संशय लॉरेन्स बिश्नोई टोळीकडे जात असल्याचे दिसत आहे. मुंबई पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे. बाबा सिद्दीकी यांच्याच्या हत्या प्रकरणी करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप या दोघांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींचे बिष्णोई टोळी कनेक्शन समोर आले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची चार जणांना दोन लाखांची सुपारी देण्यात आली होती, अशी मोठी माहिती आता समोर आली आहे.

पंजाब कनेक्शन..

हे चारही आरोपी कुर्ला परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. घराचे भाडे 14000 रुपये होते. प्रत्येकाला 50-50 हजार रुपये देण्यात आले. पंजाबमध्ये हे तिघं जणं एका जेलमध्ये असताना एकमेकांच्या संपर्कात आले. जेलमध्ये आधीपासून बिष्णोई गँगचा एक सदस्य होता त्याच्याशी यांची ओळख झाली. या हत्येसाठी कुरियरद्वारे मारेकऱ्यांना पिस्तूल सोपवण्यात आले. विशेष म्हणजे आरोपींनी जवळपास एक महिन्यांपासून बाबा सिद्दीकी यांच्या घराची तसेच कार्यालयाची रेकी केली. हल्लेखोर हे रिक्षातून आले आणि बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या शूटर्सनी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. या दाव्याची पडताळणी केली जात आहे. मुंबई पोलिसांव्यतिरिक्त केंद्रीय एजन्सीही मुंबई पोलिसांच्या संपर्कात आहे. जो कोणी सलमान खानचा मित्र असेल तो आमचा शत्रू आहे, असा इशारा लॉरेन्स बिश्नोई यांनी अनेकवेळा दिला आहे. मात्र, या शूटर्सचा लॉरेन्स बिश्नोईशी संबंध आहे की नाही, याचा तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vitthal Mandir : तिरुपती, अयोध्यानुसार पंढरपुरात टोकन दर्शन सुविधा; कार्तिकीनिमित्ताने ४ नोव्हेंबरपासून चोवीसतास दर्शन

Sayali Sanjeev: अप्रतिम असं मनमोहक सौंदर्य, पाहून घायाळ व्हाल

Diwali 2024 : दिवाळीत लक्ष्मीपूजनाला झाडू का पुजतात?

Baba Siddiqui Case: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण; मारेकऱ्यांचे पुणे कनेक्शन, आरोपी करायचा भंगार गोळा करण्याचा व्यवसाय

Munmun Dutta: तारक मेहता फेम मुनमुन दत्ताचा ग्लॅमरस अवतार, नव्या फोटोंनी वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT