Ruchika Jadhav
दिवाळी म्हटलं की घरोघरी पुजा अर्चा आणि भक्तीचं तसेच आनंद उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं.
लक्ष्मीपूजन करताना घरोघरी झाडूचे देखील पूजन केले जाते. याचे कारण काय? त्याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.
हिंदू पौराणिक कथेनुसार झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.
धनत्रयोदशी म्हणजे धनाचा दिवस असं म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी झाडू खरेदी केला जातो. झाडूसह घरात लक्ष्मी प्रवेश करचे आणि घरात धनसंपत्तीची भरभराट होते.
लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सायंकाळी ५.३५ ते ८.०६ असा आहे. तुम्ही या वेळात लक्ष्मीपूजन करू शकता.
तर दुसऱ्या दिवशी २ नोव्हेंबरला दीपावली पाडवा आहे. या दिवशी प्रत्येक पतीने आपल्या पत्नीला साडी गिफ्ट करावी.
झाडू दक्षिण-पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यात धनदौलतीची भरभराट कायम राहते.