Former Beed Collector Avinash Pathak detained by police in connection with a multi-crore land acquisition scam. saam tv
महाराष्ट्र

बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Former Beed Collector Avinash Pathak Corruption Case Details: बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना जमीन भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी लातूरमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

संदीप भोसले, साम टीव्ही

प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणारी एक घटना आज सकाळी समोर आली आहे. बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपाखाली बीड पोलिसांनी लातूर येथील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतल आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

अविनाश पाठक हे बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना राष्ट्रीय महामार्गासाठी केलेल्या जमीन भूसंपदनात मोठ्या प्रमाणात अनियमियतता झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात भूसंपदनाच्या मोबदल्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. शासकीय कागदपत्रांवर बनावट स्वाक्षऱ्या करून शासनाची फसवणूक केल्याचे तपासात सामोर आले होते. या संदर्भात बीडमध्ये रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणारचा तपास करत होते.

बीड पोलिसांचे एक पथक आज सकाळी लातूरमध्ये दाखल झाले. लातूर पोलिसांच्या मदतीने पाठक यांच्या निवासस्थानी छापा टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे महसूल विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. अविनाश पाठक यांना ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांना बीडला नेण्यात येत असून पुढील चौकशीत या घोटाळ्याचे आणखी धागेदोरे हाती लागण्याचे शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT