अजब लातूर पॅटर्न! तोंडात सिगारेट, टेबलावर दारुचा ग्लास...; ढाब्यावर बसून तपासले पेपर, शिक्षकाचा प्रताप पाहिला का?

Teacher Caught Drinking, Smoking: लातूरमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मद्यपान आणि धूम्रपान करत शिक्षकाने विद्यार्थ्यांचे पेपर तपासल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका खासगी शाळेच्या शिक्षकाचा हा प्रताप बघून विद्यार्थ्यांसह पालक संताप व्यक्त केला आहे.

लातूर शहरातील नामांकित खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या शिक्षकाने चक्क ढाब्यावर बसून धूम्रपान आणि मद्यपान करताना विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा पेपर तपासलेत. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत हा शिक्षक चक्क धूम्रपान आणि मद्यपान करताना दिसतोय. त्याच धुंदीत विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तर पत्रिका तपासत आहे. हा शिक्षक 'किड्स इन्फो पार्क" या शाळेत नोकरीला आहे. दरम्यान यापूर्वी देखील ही खासगी शाळा वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमध्ये अशाप्रकारे शिक्षणाचा चक्क धाब्यावरच काळाबाजार सुरू असल्यास, शिक्षणाचं काय होणार असा प्रश्न आणि पालक वर्ग करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com