Akola Auto Driver attack class 9 Student saam tv
महाराष्ट्र

Shocking News : धक्कादायक! रिक्षाचालकाचं भयंकर कृत्य, नववीतील विद्यार्थ्यावर नेलकटरनं हल्ला

Akola Crime News : नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर एका रिक्षाचालकानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली. शहरातील मिराज टॉकीजसमोर हा प्रकार घडला.

Nandkumar Joshi

  • अकोल्यात संतापजनक घटना

  • शाळकरी विद्यार्थ्यावर रिक्षाचालकाचा हल्ला

  • नेलकटरमधील चाकूने हातावर केले वार

  • घटनेनंतर रिक्षाचालक फरार, पोलिसांकडून शोध

अक्षय गवळी, अकोला, साम टीव्ही

Akola auto driver attack student : अकोल्यात एक धक्कादायक आणि तितकीच चीड आणणारी घटना घडली आहे. नववी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर रिक्षाचालकानं नेलकटरनं हल्ला केला. नेलकटरमध्ये असलेल्या लहान चाकूनं विद्यार्थ्याच्या हातावर वार केले. यात संबंधित विद्यार्थी जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात हल्लेखोर रिक्षाचालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अकोला शहरातील मिराज टॉकीजसमोर ही संतापजनक घटना घडली. नववीत शिक्षण घेत असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यावर रिक्षाचालकानं नेलकटरमधील चाकूने हल्ला केला. हा मुलगा शाळेतून घरी जात होता. त्यानं रिक्षा पकडली. त्यानं रिक्षाचं भाडं चालकाला दिलं. त्यानंतर उर्वरित सुटे पैसे परत मागितले. त्यावर रिक्षाचालकानं हुज्जत घातली. धक्कादायक म्हणजे रागाच्या भरात चालकानं विद्यार्थ्यावर नेलकटरने हल्ला केला. त्यातील चाकू काढून त्याच्या हातावर वार केले.

या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. सोहम असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. या घटनेनंतर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात संबंधित रिक्षाचालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हल्ला करणाऱ्या रिक्षाचालकाचं नाव अद्याप कळू शकलेलं नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, रिक्षाचालकासोबत नेमकं काय घडलं याची माहिती विद्यार्थ्यानं दिली. शाळेतून घरी जाण्यासाठी मी रिक्षा पकडली. कारण माझा रोजचा रिक्षाचालक असतो तो आला नव्हता. मला त्या रिक्षाचालकानं टॉकीजसमोर सोडलं. मी त्याला ५० रुपये दिले. त्याच्याकडून ३० रुपये परत मागितले. कुठले तीस रुपये असं तो रिक्षाचालक म्हणाला. मी माझ्या घरी फोन लावतो, तू त्यांच्यासोबत बोल असं मी चालकाला सांगितलं. त्याने वाद घातला. त्यावर त्यानं माझ्यावर हल्ला केला आणि पळून गेला, असं विद्यार्थ्यानं सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : क्षणात सर्व काही संपलं! सौदी अरेबियातील भीषण अपघात एकाच कुटुंबातील १८ लोकांचा मृत्यू

Income Tax Refund: करदात्यांसाठी बातमी, कर परतावा कधी मिळणार, आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Politics: चंद्रपुरात भाजपसोबत मोठा गेम,४ नगरपरिषदांमध्ये पक्षात्तर करत थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधातच बंडखोरी

Supreme Court :...तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करू; निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचा सरकारला इशारा

Maharashtra Live News Update: मुंबईत लोकलमध्ये गर्दुल्याचा धुमाकूळ

SCROLL FOR NEXT