Crime : विवाहितेला नवऱ्याने तर तरुणीला अज्ञातांनी मारले; दोन महिलांच्या हत्येने औरंगाबाद हादरले SaamTV
महाराष्ट्र

Crime : विवाहितेला नवऱ्याने तर तरुणीला अज्ञातांनी मारले; दोन महिलांच्या हत्येने औरंगाबाद हादरले

सोमवारी सकाळी इंदुमती कामावर गेली मात्र संध्याकाळी 6 वाजले तरी ती परत आली नसल्याने वडिल आणि भावंडानी तिच्या मैत्रीणी आणि नातेवाईकांकडे शोधल मात्र ती सापडली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील एका तरुणीसह अन्य एका विवाहित महिलेचा खून Murder झाला असून तरुणीच्या खून तिच्या मित्रानेच केल्याची शक्यता आहे. तर विवाहित महिलेची हत्या तिच्या नवऱ्याने केल्याचे उघड झाले आहे. मात्र या हत्यांमुळे औरंगाबादमधील हत्यांचे सत्र काही संपताना दिसत नाहीये.

हे देखील पहा -

मुकुंदवाडी येथे 2 दिवसांत 22 वर्षीय तरुणी आणि 39 वर्षाच्या विवाहित महिलेच्या मृत्येने परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. मृत मुलीचे नाव इंदुमती बारकुराय (Indumati Barkurai) आहे. तर विवाहित महिलेचे नाव सुनिता चिनगारे (Sunita Chingare) आहे.

22 वर्षीय इंदुमती मोबाइलच्या शोरुममध्ये (Mobile Showroom) आठवड्यापुर्वी कामाला लागली होती. तर ती वडील आणि दोन भावांसोबत मुकुंदनगरमध्ये राहत होती. सोमवारी इंदुमती सकाळी कामावर गेली मात्र संध्याकाळी 6 वाजले तरी ती परत आली नसल्याने वडिल आणि भावंडानी तिच्या मैत्रीणी आणि नातेवाईकांकडे इंदुमतीचा शोधल मात्र ती सापडली नाही. मंगळवारी सकाळी मुकुंदनगरच्या शेजारच्या बायपासच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या मैदानावरती दूध विकण्यासाठी निघालेल्या महिलांना तिचा मृतदेह दिसला. इंदुमतीच्या हातावरती आणि गळ्यावरती कसले तरी वण दिसत होते.

मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलीस (Mukundwadi Police) घटनास्थळी गेले. मात्र मंगळवारी सकाळीच इंदुमती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करायला गेलेल्या घरच्यांना तिचा मृतदेहच मिळाल्यांने त्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात मुकुंदवाडी पोलीसांनी गुन्हा नोंद केला आहे.

पतीनेच केला पत्नीचा खून -

दुसऱ्या घटनेत चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नी सुनिता शिनगारे यांचा झोपेत गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 2 दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत पती पोपट शिनगारे हा आपल्या पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगत होता. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदनाचा अहवालामुळे महिलेचा खून झाल्याचे समोर आले पोलिसांनी रिमांडवर घेताच पती पोपट याने खुनाची कबूली दिली आहे. मात्र या दोन्ही घटनांनी मुकुंदवाडी परिसर हादरुण गेला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिरूरमध्ये बिबट्याची दहशत, जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल|VIDEO

Back Pain: खुर्ची किंवा खराब पोस्चर नव्हे, मेंटल स्ट्रेसही बनू शकतो कंबरेच्या दुखण्याचं मोठं कारण

Maharashtra Live News Update : स्वतःची कारखानदारी वाचवण्यासाठी लोटांगण घालणाऱ्या विखे पाटलांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलू नये

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का, २५ वर्षे पक्षात काम केलेल्या माजी नगराध्यक्षाने हाती धरलं कमळ

४०-५० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस थेट २०० फूट खोल दरीत कोसळली, विद्यार्थी बसमध्ये अडकले, VIDEO

SCROLL FOR NEXT