Aurangabad Theft News Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad : जैन मंदिरातील दोन किलो सोन्याची मूर्ती बदलली; 'असा' झाला घटनेचा उलघडा

दोन किलो सोन्याची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी बदलली

डॉ. माधव सावरगावे

Aurangabad Theft News : औरंगाबादच्या (Aurangabad) कचनेर येथील श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातून तब्बल दोन किलो वजनाची सोन्याची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी बदलली असल्याची घटना उघडकीस आली आहे आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक यांनी भेट देऊन तपासाचे आदेश दिले आहेत. (Latest Maharashtra News)

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी गाभाऱ्यातून दोन किलो वजनाची सोन्याची मूर्ती लंपास केली आणि त्याजागी पंचधातूची दुसरी दिसणारी मूर्ती बसविली. मात्र, या चोरट्यांनी मूर्तीची अदलाबदली नेमकी कशी आणि केव्हा केली याबाबाद कुणालाही माहित नाही. (Tajya News)

मात्र काल मूर्तीच्या पायाजवळचा भाग पांढरा पडत चालल्याचे लक्षात आले. त्यातून त्यांनी मूर्ती बदलली गेल्याचा संशय व्यक्त केला आणि त्यानंतर मूर्तीचे परीक्षण करण्यात आले. तेव्हा या मूर्तीचे वजन करण्यात आले. खोटी मूर्ती 1 किलो 66 ग्राम भरली, तर मूळ सोन्याची मूर्ती दोन किलो 300 ग्राम वजनाची आहे.

त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. मूळ सोन्याची मूर्ती बदलून त्याजागी हुबेहूब दिसणारी मूर्ती बसवण्यात आल्याने मूर्ती बदलल्याचे कुणाच्याच लक्षात आले नाही. पोलिसांकडून मंदिरातील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांसमोर आता मूळ सोन्याची मूर्ती शोधण्याचे आवाहन असणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पती स्नॅक्स आणायला विसरला आणि पत्नीने केला चाकूहल्ला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार

Fact Check: सतत नोकरी बदलताय? तर भरावा लागणार लाखो रुपयांचा दंड; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra politics : कोकाटेंचं सेंड ऑफ होणार? अजित पवारांकडून आमदारांसाठी आज स्नेह भोजन

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! इतक्या रुपयांची फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् दर महिन्याला मिळवा २०,००० रुपये

SCROLL FOR NEXT