Eknath Shinde and Devendra Fadnavis Latest News SAAM TV
महाराष्ट्र

फडणवीस हे एकनाथ शिंदेंना लिहून देतात अन् बोलायला लावतात; शिवसेना नेत्यांची टीका

औरंगाबादच्या संभाजी नगर नामांतराच्या प्रस्तावाला स्थगिती देण्याच्या वृत्तानंतर राजकीय वातावरण तापलं आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: औरंगाबादचं नामांतर करून संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशीव करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना, अखेरच्या कॅबिनेट बैठकीत घेतला होता. मात्र, या निर्णयाला स्थगिती देण्याचा विचार नव्याने राज्यात सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने घेतल्याचे वृत्त आहे. यावरून आता राजकारण तापलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी नाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही त्याला स्थगिती देणे योग्य नाही. या प्रस्तावाला स्थगिती केवळ श्रेयवादासाठी आहे, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. यावेळी त्यांनी शिंदे आणि फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस हे पेन घेऊन एकनाथ शिंदे यांना लिहून देतात आणि त्यांना बोलायला लावतात हे योग्य नाही, असा घणाघातही त्यांनी केला. (Shivsena Leaders criticizes Eknath Shinde And Devendra Fadnavis)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. बहुमताच्या जोरावर शिंदे गट आणि भाजपने (BJP) राज्यात नवं सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर, फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यात नवं सरकार सत्तेत आल्यानंतर शिंदे-फडणवीसांनी राज्यात निर्णयांचा सपाटा लावला आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारनं या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे, असे वृत्त आहे. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी नव्या सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही स्थागिती देता हे योग्य नाही. या प्रस्तावाला स्थगिती हे फक्त श्रेयवादासाठी आहे, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांना पेन घेऊन फडणवीस लिहून देतात आणि त्यांना बोलायला लावतात हे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. यापुढे हे असेच होईल असे सांगत फडणवीस हे सगळं घडवून आणतात. त्यांनी शिवसेनेला संपवायचं ठरवलं आहे, मात्र शिवसेना संपणार नाही, असंही खैरे म्हणाले. (Chandrakant Khaire)

एकनाथ शिंदे बोलले होते की संभाजीनगर प्रस्ताव दिल्लीला पाठवू आणि आता स्थगित केला. हे श्रेय घेण्यासाठी आहे. त्यांनी एका महिन्यात नाव बदल दिल्लीतून मंजूर करून घ्यावे, अन्यथा आम्ही त्यांना उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

दुसरीकडे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनीही शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना पोटशुळ उठलेलं आहे. त्यामुळे संभाजीनगरचा मंजूर प्रस्ताव स्थगित केलेला दिसतोय. ज्यांना पाच वर्षे सत्तेत असताना ते करता आलं नव्हतं; ते उद्धव ठाकरेंनी केलं. आता उद्धव ठाकरे यांना श्रेय मिळू नये म्हणून हा प्रयत्न असल्याचं अंबादास दानवे म्हणाले.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT