Chhatrapati Sambhaji Nagar in Marathi
Chhatrapati Sambhaji Nagar in Marathi  Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad Renaming : फक्त शहराचं नाव बदललं की संपूर्ण जिल्ह्याचं? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Satish Daud-Patil

Chhatrapati Sambhaji Nagar in Marathi : केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराला शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) मंजुरी दिली. त्यामुळे लवकरच औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशिव ठेवलं जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अशातच विरोधकांनी यावर फक्त शहराचं नाव बदललं की संपूर्ण जिल्ह्याचं? असे सवाल उपस्थित केले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत उत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नामकरण ‘ छत्रपती संभाजीनगर’ (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण’धाराशिव’ करण्याची मागणी करण्यात येत होती. संबंधित दोन्ही शहरांचं नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता.

आज केंद्र सरकारने दोन्ही शहरांचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळात दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता तसेच यासंदर्भात विधिमंडळात देखील ठराव संमत झाला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतराला केंद्राने मंजुरी दिल्याची माहिती दिली.

दरम्यान, दोन्ही जिल्ह्याच्या नामांतराला केंद्राकडून मंजुरी मिळाल्यानंतर फक्त औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नाव बदललं की संपूर्ण जिल्ह्याचं? याबाबत संभ्रम निर्माण झाला. सोशल मीडियावरही याबाबत प्रश्न विचारण्यात येत आहे. यावरून विधानपरिषदेचे विरोधपक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील सवाल, उपस्थित केला होता.

आता अंबादास दानवे यांच्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. अंबादास जी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' असे नामकरण झाले आहे, असं ट्विट फडणवीसांनी केलं आहे.

महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

औरंगाबादच्या नामांतराचा वाद पेटणार?

दरम्यान औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर एमआयएमने टीका केली आहे. 'औरंगाबाद आमचं शहर होतं आणि आहे. आता औरंगाबादमध्ये आमच्या शक्तीचं प्रदर्शन बघा. आमच्या प्रिय शहरासाठी आम्ही मोर्चा काढणार. औरंगाबादकरांनो शहरांच्या नावाचं राजकारण करणाऱ्या या शक्तींचा (भाजप) पराभव करण्यासाठी तयार व्हा. आम्ही याचा निषेध नोंदवतो, आम्ही लढू,' असं आक्रमक ट्वीट इम्तियाज जलिल यांनी केलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: महाविकास आघाडी संयुक्त पत्रकार परिषद घेणार

Pune Cyber Fraud: धक्कादायक! शेअर ट्रेडिंमधून पैसा कमावण्याचे आमिष; पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाला ४३ लाखांचा गंडा

Sanjay Raut : मुंबई महापालिकेने पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी ३ कोटी दिले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune Rain News: विज पडल्याच्या आवाजाने घाबरुन ३ महिला पडल्या बेशुद्ध; एकीचा मृत्यू

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; सामान्यांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT