Udhav Thackeray: औरंगाबादचं झालं 'छत्रपती संभाजीनगर'! उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले; 'माझ्या शेवटच्या बैठकीत...'

माझ्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत सोबतच्या इतर पक्षाच्या सहकाऱ्यांनी देखील या निर्णयाला होकार दिला होता, असं उद्धव ठाकरे म्हणाले..
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam Tv
Published On

Aurangabad Renamed As Chhatrapati Sambhajinagar: औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सराकरने मंजुरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. या मोठ्या निर्णयानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Udhav Thackeray) पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra: मोठी बातमी! औरंगाबाद आता ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे झाले ‘धाराशिव’; नामकरणाला केंद्राची मंजुरी

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल बोलताना "आजच माझ्या कानावर आलं की जे माझ्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचं नाव बदलण्याचा निर्णय घेतलेला. या प्रस्तावाला केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. म्हणून मी आता असलेल्या महाराष्ट्र सरकारला धन्यवाद,"

"कारण आम्ही घेतलेल्या निर्णयांपैकी या निर्णयांना त्यांनी मंजुरी दिली. माझ्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत सोबतच्या इतर पक्षाच्या सहकाऱ्यांनी देखील या निर्णयाला होकार दिलेला”, असं उद्धव ठाकरे म्हणाले

Uddhav Thackeray
Sambhajinagar: बाळासाहेब ठाकरेंची ती ऐतिहासिक सभा अन् त्यांचं स्वप्न...; जाणून घ्या 'संभाजीनगर'च्या नामांतराचा ३४ वर्षापूर्वीचा इतिहास....

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मानले आभार...

या निर्णयानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली, हे ऐतिहासिक पाऊल आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचे खूप खूप आभार, असे ते म्हणाले.

दरम्यान, 29 जून 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र 4 जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाने महाविकास आघाडी सरकारने केलेल नामांतराचा ठराव रद्द केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com