Aurangabad Rain Saam TV
महाराष्ट्र

स्मशानभूमी नाही म्हणून नदीपात्रात चिता पेटवली अन् नदीला पूर आल्याने सगळंच बिनसलं...

पावसामुळे एका मृतदेहाची देखील पावसामुळे हेळसांड झाल्याची घटना समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया -

औरंगाबाद : राज्यभरात परतीचे पावसाने अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. अवेळी पडलेल्या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, तर शेतकऱ्यांचे ऐन काढणीला आलेली पिकं पावसामुळे मातीमोल झाली आहेत. या पावसाचा (Heavy Rain) फटका सर्वांनाच बसला आहे. (Aurangabad)

मात्र, एका मृतदेहाची देखील पावसामुळे हेळसांड झाल्याची घटना घडली आहे. कन्नड तालुक्यातील (Kannada Taluka) आमदाबाद येथील एका महिलेचे निधन झाले. नातेवाईकांसह ग्रामस्थांनी नदीपात्रातील उंच जागेवर अंत्यसंस्कार केले. परंतु, काही वेळातच नदीपात्रात पाण्याची पातळी वाढल्याने धगधगत्या चितेला पुराच्या पाण्याने वेढल्याची घटना काल घडली.

पाहा व्हिडीओ -

कन्नड तालुक्यातील आमदाबाद येथे स्वतंत्र स्मशानभूमी नाही. गावाशेजारील अंजना नदीच्या पात्रालगतच मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. चितेला भडाग्नी दिल्यानंतर काही वेळातच अंजना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. काही क्षणातच धगधगत्या चितेला पुराने वेढले. त्यामुळे नातेवाईकांची अस्वस्थता वाढली. मात्र, मोठ्या शर्थीने नातेवाईक व ग्रामस्थांनी प्रयत्न केल्याने मृतदेह अखेर पुर्णपणे जळला गेला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज ठाकरे उद्या सोलापूर दौऱ्यावर, पूरपरिस्थितीची पाहणी करणार

Navapur Police : भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली दारू तस्करी; नवापूर पोलिसांच्या कारवाईत ५ लाखांची दारू जप्त

OTT Releases: विकेंड होणार धमाकेदार, एक-दोन नाही तर तब्बल १३ वेब सिरीज आणि चित्रपट होणार प्रदर्शित

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

SCROLL FOR NEXT