Aurangabad News Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad Railway Station : औरंगाबाद रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट; 359 कोटी रुपये खर्चून काय बदलणार? कधीपर्यंत काम पूर्ण होणार?

Amrit bharat station : सध्याच्या आणि भविष्यातील प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्थानक पुनर्विकासासाठी निवडले गेले आहे.

प्रविण वाकचौरे

Chhatrapati Sambhajinagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 508 रेल्वे रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी करण्यात आली. या योजनेत राज्यातील 44 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. यामध्ये औरंगाबाद रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे.

औरंगाबाद हे राज्यातील प्रमुख रेल्वे स्थानकांपैकी एक असून 359 कोटी रुपये खर्चून सध्याच्या आणि भविष्यातील प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्थानक पुनर्विकासासाठी निवडले गेले आहे. रेल्वे स्थानकाचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. रेल्वे प्रवाशांना सेवा देण्यासाठी स्थानक कॉम्प्लेक्सला इतर पायाभूत सुविधा आणि प्रवासी सुविधांसह एकत्रित करण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार केला जाणार आहे.

स्थानक पुनर्विकासासह एका मोडमधून दुसऱ्या मोडमध्ये प्रवाशांच्या अखंड हस्तांतरणासाठी स्थानक परिसरातील वाहतुकीच्या अनेक पद्धती एकत्रित केल्या जाणार आहेत. व्यवसायाच्या संधींच्या निर्मितीसह शहराच्या रस्त्यांच्या नेटवर्कशी एकत्रित जोडले जाणार आहे. स्थानकाच्या दोन्ही बाजूंना जोडण्यासाठी दक्षिण बाजूची एंट्री (प्रवेश) देखील देण्यात येणार आहे.

रेल्वे प्रवाशांची उत्तम कनेक्टिव्हिटी आणि गतिशीलता, प्रवाशांसाठी सोयीस्कर पिकअप आणि ड्रॉप ऑफ क्षेत्रे, पुरेशी पार्किंग सुविधा या इतर सुविधा आहेत.

औरंगाबाद स्थानकाच्या पुनर्विकासामुळे जागतिक दर्जाच्या सोयी आणि सुविधांसह वर्धित अनुभव मिळेल ज्यामुळे भविष्यात वाढणाऱ्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण होणार आहेत.

काय सुविधा मिळणार?

सध्याच्या 5,675 चौ.मी.च्या तुलनेत प्रस्तावित स्थानक इमारत क्षेत्राचे 27,073 चौ.मी. असेल. उत्तर स्थानक इमारत 22,180 स्क्वेअर मीटर आणि दक्षिण स्थानक इमारत 4,893 स्क्वेअर मीटर टर्मिनल बिल्डिंग आणि सर्व प्लॅटफॉर्मला जोडणारा 72 मीटर डबल लेव्हल एअर कॉन्कोर्स असेल. (Latest Marathi N्ews)

 ‘अमृत भारत स्थानक’ योजनेअंतर्गत सर्व प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा केली जाणार आहे. भविष्यातील विकासासाठी मल्टी लेव्हल कार पार्किंगसाठी तरतूद देखील आहे. वेटिंग कॉन्कोर्स क्षेत्र 4,752 चौ.मी असेल. रेल्वे स्थानकात 13 लिफ्ट आणि 12 एस्केलेटर असतील.

इतर सुविधा

  • छतावर सौर पॅनेलसह पर्यावरण पूरक बिल्डिंग प्रमाणपत्र

  • दिव्यांगांसाठी अनुकूल सुविधा

  • पावसाचे पाणी साठवण, पाण्याचा पुनर्वापर आणि घनकचरा व्यवस्थापन

  • आपत्कालीन पॉवर बँकअपसह अग्निशमन व्यवस्था पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक कार चार्जिंग पॉइंट

  • वाय-फायची सुविधा

  • लॅपटॉप,मोबाइल चार्जिंग पॉइंट्स, फार्मसी आणि वैद्यकीय सुविधा, प्रीपेड कॅब सुविधा, फूड कोर्ट झोन, शॉपिंग एरिया

  • केंद्रीकृत सीसीटीव्ही मॉनिटरिंग सिस्टम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shrigonda Vidhan Sabha : राहुल जगताप यांचे पक्षातून निलंबन; बंडखोरी केल्याने शरद पवार गटाची कारवाई

Vande Bharat food : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये देण्यात आलेल्या सांबारात किडे तरंगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल, या ठिकाणी घडली घटना

Solapur Politics : सोलापुरात शिंदे गटाच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; राजकीय वर्तुळात खळबळ

GK: भारताव्यतिरिक्त 'या' देशांमध्येही रुपया चालतो, प्रवास करण्याआधी जाणून घ्या

Big Boss 18: अशनीर ग्रोव्हरची बिग बॅासमध्ये एन्ट्री; सलमान खानने घेतली शाळा,VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT