Paithan Bail Pola News Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad News : पैठणमध्ये बैलपोळा फोडण्यावरून दोन गटात हाणामारी; VIDEO व्हायरल

बैलपोळ्याच्या सणात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापाडिया, साम टिव्ही

औरंगाबाद : राज्यभरात आज बैलपोळ्याचा सण (Bail Pola Festival) उत्सवात साजरा केला जात आहे. आपल्या सर्जा राज्याला सजवून बळीराजा पोळा सण साजरा करीत आहे. अशातच औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बैलपोळ्याच्या सणात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Bail Pola Festival Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, बैलपोळा फोडण्यावरून हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. पैठण तालुक्यातील कोळीबोडखा गावात हा प्रकार घडला आहे. दोन गटात झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Aurangabad News Today)

कोळीबोडखा येथे पोळा फोडण्यावरुन दोन गटात जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं. विशेष म्हणजे या दोन गटात हाणमारी सुरू झाली असता बंदोबस्त असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही या घटनेत जोरदार धक्काबुकी करण्यात आल्याचा प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाली आहे. (Paithan Todays News)

दरम्यान, पोलिसांनी वेळेवर मध्यस्थी करून या दोन गटांचा वाद मिटवला. या सर्व प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर बैलपोळा फुटला. शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बळीराजाला पुरणपोळी सुद्धा चारली. हा वाद वगळता पैठण तालुक्यात बैलपोळ्याचा सण उत्सवात साजरा झाला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याच्या दरात वाढ झाली की घसरण; आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

Daily wear Mangalsutra Design: डेली वेअरसाठी 'हे' नाजूक आणि एलिग्नंट मंगळसूत्र डिझाईन, नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update : बीड जिल्ह्यातील चार नगरपरिषदाच्या दहा जागांसाठी आज मतदान

Heart Blockage: हार्ट ब्लॉकेजची सुरुवातीची लक्षणे काय? जाणून घ्या याचं मूळ कारण अन् शरीरावर होणारा परिणाम

Weight Loss: दररोज सकाळी 'हे' काम केल्याने वजन होईल लवकर कमी, आठवडाभर करुन पाहा हे उपाय

SCROLL FOR NEXT