Aurangabad Accident News
Aurangabad Accident News  Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad : चहा प्यायला जाणे बेतले जीवावर; दोघांचा अपघाती मृत्यू

माधव सावरगावे, औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबादमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. चहा पिण्यासाठी जात असताना दुचाकीचा अपघात (Accident) होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कागझिपुराजवळ ही घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेदरम्यान घडली. या घटनेने मृतांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ( Aurangabad Latest News In Marathi )

औरंगाबादहून (Aurangabad) चार मित्र दोन दुचाकीवर चहा पिण्यासाठी खुलताबाद जवळील कागझिपुरा येथे जात होते. या दरम्यान एका वळणावर दुचाकीचे नियंत्रण सुटले. त्यामुळे एक दुचाकी रस्त्याच्याकडेला असलेल्या दुभाजकाला धडकली. या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. दोघेही मृत व्यक्ती हे औरंगाबादचे राहणारे असून चांगले मित्र आहेत. जयेश निरंजन घोरपडे आणि मधुर बाळासाहेब भडांगे अशी मृतांची नावे आहेत. या अपघातामुळे खुलताबाद औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दोन्ही मित्रांच्या मृत्यूने त्यांच्या गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

औरंगाबादमध्ये पोलीस निरीक्षकावर जीवघेणा हल्ला

औरंगाबादमध्ये पोलीस निरीक्षकावर त्यांच्या कॅबिनमध्येच चाकून जीवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेने औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे. औरंगाबादच्या जिन्सी पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. पोलिस ठाण्यातील पोलीस निरीक्षक केंद्र यांच्यावर ठाण्यातीलच कर्मचाऱ्याने जीवघेणा हल्ला केला आहे. शेख मुजाहेद असे हल्लेखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर त्याला अटक देखील करण्यात आली आहे. सध्या पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभाग उपचार सुरू आहे. पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्यावर चाकू हल्ला झाल्याने औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astrology: रस्त्यात सापडलेले पैसे उचलणं शुभ की अशुभ?

Today's Gold Silver Rate : सोन्याचे दर पुन्हा कडाडले, चांदीही महागली; मुंबई-पुण्यातील आजचा भाव काय?

Chandrahar Patil: वसंतदादांचे नातू भाजपची बी टीम; पाकीट घेऊन 'मविआ'समोर उभे.. चंद्रहार पाटलांचा विशाल पाटलांवर प्रहार!

Today's Marathi News Live : श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीसाठी हजारो कार्यकर्ते डोंबिवलीत दाखल

Police Constable Death: चोरट्यांचा पाठलाग जीवघेणा ठरला; पाठीत विषारी इंजेक्शन खुपसलं, पोलीस जीवानिशी गेला

SCROLL FOR NEXT