Police Constable Death: चोरट्यांचा पाठलाग जीवघेणा ठरला; पाठीत विषारी इंजेक्शन खुपसलं, पोलीस जीवानिशी गेला

Police Constable Killed By Poisonous Injection: मुंबईमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलला चोरट्यांनी विषारी इंजेक्शन दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी समोर आली आहे.
Police Constable Death
Police Constable Deathyandex

सचिन गाड, साम टिव्ही मुंबई

मुंबई पोलिसांच्या लोकल आर्मसमधील एका पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद परिस्थितीक मृत्यू झाला आहे. माटुंगा स्थानकाजवळ नशेखोरांनी या पोलीस कॉन्स्टेबलवर प्राणघातक हल्ला केला (Mumbai Crime News) होता. या पोलीस कॉन्स्टेबलला चोरट्यांनी विषारी इंजेक्शन दिल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना बुधवारी समोर आली आहे. विशाल पवार (Vishal Pwar) असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे.

पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable Killed) विशाल पवार नेहमीप्रमाणे रविवारी रात्री कामावर जात होते. त्यावेळी ते लोकलमधून प्रवास करत होते. सायन आणि माटुंगा स्थानकादरम्यान ते लोकलच्या दरवाज्यात उभे राहून फोनवर बोलत होते. त्यावेळी एका व्यक्तीने विशाल पवार यांच्या हातावर फटका मारला. तो त्यांचा मोबाईल घेऊन पळाला होता.

मोबाईल चोराला पकडण्यासाठी विशाल पवार यांनी ट्रेनमधून उडी मारली. त्यांनी मोबाईल चोराचा पाठलाग सुरू केला होता. मात्र, पुढे दबा धरून बसलेल्या चोरांनी आणि नशेखोरांनी विशाल पवार यांना घेरलं. त्यांच्यावर जीवघेणा (Mumbai News) हल्ला केला.

या नशेखोरांनी पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार यांना पकडून त्यांच्या पाठीत विषारी इंजेक्शन दिलं. तर, त्यांच्या तोंडातून लाल रंगाचं द्रव्य ओतलं होतं. यामुळे विशाल पवार बेशुद्ध पडले. त्यांना तब्बल १२ तासांनी शुद्ध (Mumbai Crime) आली. परंतु, घरी गेल्यावर मात्र विशाल पाटील यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने ठाण्याच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यावेळी उपचारादरम्यान विशाल पवार यांचा मृत्यू झाला (Poisonous Injection) आहे.

Police Constable Death
Mother And Son Killed In Amravati: दुहेरी हत्याकांडाने अमरावती हादरलं; ३०० फुट जागेसाठी मायलेकाला संपवलं

परंतु, मृत्यूपूर्वी कोपरी पोलिसांनी विशाल पवार यांचा जबाब घेतला होता. दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद (Police Constable Death) केली होती. आता या प्रकरणाचा पुढील तपास दादर जीआरपीकडे वर्ग करण्यात आलं आहे. दादर जीआरपी करणार कलम ३०२ (हत्या) अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करत आहे.

Police Constable Death
Son killed mother : बायकोसोबत मोबाईलवर बोलताना आई मध्येच बोलली; रागाच्या भरात मुलाकडून धारदार शस्त्राने हत्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com