HSC Exam Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad: शिक्षकांनो तयारीला लागा! मराठवाड्यातील ३५ हजार शिक्षकांना द्यावी लागणार परीक्षा, काय आहे कारण?

मराठवाड्यातील ३५ हजार शिक्षकांना द्यावी लागणार परीक्षा

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - मराठवाड्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील शिक्षकांचं बुद्ध्यांक जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. लातूर जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल यांनी लातूर (Latur) जिल्ह्यात राबविलेला पथदर्शी प्रकल्प आता मराठवाड्यात (Marathwada) राबविला जाणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी हा निर्णय औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

पंधरवाड्यापूर्वी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्यानंतर तिथली गुणवत्ता पाहून शिक्षक आणि अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले होते. शिक्षणाचा दर्जाबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी झापले, तो एक ऑडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी विभागीय सुनील केंद्रीकरांनीच एक पाऊल टाकत आता शिक्षकांची परीक्षा घेण्याचे ठरवले आहे.

या परीक्षांची जबाबदारी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आणि लातूरच्या जिल्हा परिषदेचे सीईओवर या प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या सीईओंची उपस्थिती होती.

मराठवाड्यातील ८ ते १० हजार जिल्हा परिषद शाळा आणि ३५ हजारांच्या आसपास शिक्षकांसाठी राबविण्यात येणार आहे. लातूरच्या धर्तीवर मराठवाड्यात बेसलाईन असेसमेंट करण्यात येणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आजची परिस्थिती, चार महिन्यांनंतरच्या परिस्थितीचे मूल्यांकन होईल. ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून शिक्षक, विद्यार्थ्यांचे ट्रेकिंग करण्यात येईल.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

SCROLL FOR NEXT