Aurangabad Crime Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad Crime : बायकोला बघून शिट्या मारतो म्हणून तरुणाचा खून; औरंगाबादेतील धक्कादायक घटना

औरंगाबादेतील धक्कादायक घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aurangabad Crime News : औरंगाबाद येथून एक धक्कादायक घटना घडली आहे. बायकोला शिट्या मारतो म्हणून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. तत्पूर्वी त्याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची अफवा सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथे पसरली होत. मात्र पोलीस तपासात हा बिबट्याचा हल्ला नसून त्याचा खून झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपीस २४ तासाच्या आत जेरबंद केले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

शेतात पाणी भरण्यास आणि पार्टीसाठी जाणाऱ्यास रवींद्र काजळे या तरुणाचा 1 जानेवारी रोजी बिबट्याच्या हल्लात मृत्यू झाल्याची अफवा सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथे पसरली होती. मात्र तो बिबट्याचा हल्ला नसून बायकोला शिट्या मारतो म्हणून त्या तरुणाचा खून केला असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे.

याप्रकरणी गणेश चव्हाण याला पोलिसांनी 24 तासांत जेरबंद केलं आहे. रवींद्र बायकोला शिट्या मारतो म्हणून त्याचा खून केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. याप्रकरणी सिल्लोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

रवींद्र हा गणेशच्या बायकोला वाईट नजरेने बघत होता तिला शिट्या मारत होता. गणेशने त्याला अनेक वेळा समजावले पणरवींद्रने ऐकले नाही. याच रागाच्या भरात गणेशने रवींद्रचा काटा काढला. ज्या ठिकाणी हा खून झाला त्या ठिकाणी आरोपीचा मोबाईल सापडला. गुन्हा घडला तेव्हा पासून गणेश हा गावातून फरार होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filing 2026: 31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर मोठा आर्थिक फटका; प्रत्येक करदात्याने ही बातमी एकदा वाचाच

Bollywood Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध अभिनेत्री चढली बोहल्यावर; नवऱ्यासाठी केली खास पोस्ट, पाहा लग्नाचे PHOTOS

Maharashtra News Live Update: यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर

पाण्याचा एक थेंबही न घालता बनवा कुरकुरीत 'खेकडा भजी', चव एवढी भारी की न खाणारेही खातील

Mumbai : बोगस DCP ला करायचा मदत, मुंबईत PSI ला बेड्या, चोर-पोलिसाचं बिंग असं फुटले

SCROLL FOR NEXT