Jalna Farmer News Saam Tv
महाराष्ट्र

पाण्याअभावी ऊस करपला, तरीही ट्रान्सफार्मर मिळेना; अखेर शेतकऱ्याने...

Jalna Latest Marathi News : किटकनाशक प्राशन करण्यासाठी चव्हाण यांनी बाटली बाहेर काढली

लक्ष्मण सोळुंके

जालना : महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही ट्रान्सफार्मर मिळत नसल्याने शेतकरी थेट महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्याच्या दालनात गेला. सोबत आणलेली किटकनाशकाची बाटली काढली आणि विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने अधीक्षक अभियंत्याच्या दालनात बसलेल्या ईतर अधिकाऱ्यांनी ही बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे अनर्थ टळला. जालन्यातील महावितरणच्या कन्हैयानगर भागातील कार्यालयात मंगळवारी (17 मे) दुपारी ही घटना घडली. (Attempt Of Self Immolation By Farmers At MSEDCL Office Jalna)

महादेव चव्हाण असं या शेतकऱ्याचं नाव असून ते परतूर तालुक्यातील चिंचोली येथील रहिवाशी आहे. चव्हाण यांची चिंचोली शिवारात शेती आहे. त्यांनी 2 एकर ऊसाची लागवड केली होती. मात्र, वीजेअभावी ऊसाला पाणी देता येत नसल्याने त्यांचा 2 एकर ऊस करपून गेला. आपल्याला नवीन ट्रान्सफार्मर मिळेल या आशेने त्यांनी आजवर महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिंजवले मात्र त्यांना ट्रान्सफार्मर मिळाला नाही.

धक्कादायक बाब म्हणजे, चव्हाण यांच्या शेतालगत अगोदर ट्रान्सफार्मर होता. हा ट्रान्सफार्मर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी इतरत्र हलवला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान, महावितरण कार्यालयात वारंवार चकरा मारून सुद्धा आपल्याला ट्रान्सफार्मर मिळत नसल्याने चव्हाण हे मंगळवारी महावितरण अधीक्षक अभियंत्याच्या दालनात आले. यावेळी त्यांनी सोबत किटकनाशकाची बाटली आणली होती.

किटकनाशक प्राशन करण्यासाठी चव्हाण यांनी बाटली बाहेर काढली. त्याचवेळी अधीक्षक अभियंत्याच्या दालनात बसलेल्या इतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या हातातून ही बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांना ट्रान्सफार्मर बदलून देण्यास टाळाटाळ करत असल्याने जगावं की मरावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT