Nagpur Aamdar Niwas  Saam Tv
महाराष्ट्र

Winter Session: आमदारांच्या पीएची दैना! आमदार निवासात जेवण नीट मिळेना, कॅमेऱ्यात शूट करत दाखवली स्थिती

Nagpur Aamdar Niwas: नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. हिवाळी अधिवेशनात आमदार लोकांच्या (पीए) स्वीय सहाय्यकांच्या जेवणाचे वांदे झाले झाले आहेत. काय आहे प्रकार ते जाणून घेऊ.

Bharat Jadhav

रुपाली बडवे, साम प्रतिनिधी

कच्चा उपमा, कच्चं जेवण, आणि पातळ वरण हा पदार्थांचा मेनू आहे, नागपुरातील आमदार निवासच्या कॅन्टीनचा. आमदार निवास म्हटलं म्हणजे चवदार आणि स्वादिष्ट जेवण मिळत असेल असं तुम्हाला वाटत असेल परंतु राव येथील परिस्थिती खूपच उलटी आहे. येथील कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात आहे, ही बाब खुद्द आमदार प्रवीण स्वामी यांनी उजेडात आणलीय.

ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी कॅन्टीनमधील जेवणाचा व्हिडिओ बनत तेथील पदार्थाचा दर्जा कॅमेऱ्यापुढे आणला. निकृष्ट दर्जाचे जेवणाबाबत त्यांनी थेट व्यवस्थापकांची कानउघडणी केलीय. अधिवेशनाच्या काळात राजकीय लोकांची मोठी रेलचेल येथे असते. आमदारांच्या मतदारसंघातील लोक आणि आमदारांचे पीए येथे जेवणासाठी येत असतात. त्यांना हे निकृष्ट पद्धतीचे जेवण खावावे लागत आहे. आमदारांच्या पीएने आमदारांकडे या जेवणाच्या दर्जाची तक्रार करत सभागृहात सरकारकडे जाब विचारावा अशी मागणी केली.

नागपूर अधिवेशनाच्या काळात आमदार लोकांच्या पीएचं हाल होत आहेत. त्यांनी निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची बाब समोर आलीय. विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात चालू आहे. राज्यातील सर्व आमदार आपल्या पीएसोबत नागपुरात अधिवेशनासाठी गेले आहेत. अधिवेशन काळात राजकीय लोकांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असते. मात्र याकाळात मंत्र्यांच्या पीए लोकांना जेवणाबाबत परवड होतेय.

आमदार निवासात पीए लोकांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची बाब समोर आलीय. सरकार स्थापनेनंतर 15 व्या विधानसभेचे नियमित होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे.हे अधिवेशन सहा दिवसांचे आहे. हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार असल्याने राज्यभरातून पाहुणेही शहरात आलेत. पण जेवणाची सोय चांगली नसल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केलीय.

कॅन्टीनमधील जेवणाचा व्हिडिओ स्वत: ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी शूट केलाय. आमदार निवासात मिळणाऱ्या जेवणाबाबत आमदार प्रवीण स्वामी हे विधानसभा अध्यक्षांकडे लेखी तक्रार करणार आहेत. मागील चार दिवसांपासून आमदार निवासातील जेवणाबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याची बाबही समोर आलीय. नाष्टा असो की जेवण सर्वच निकृष्ट असल्याची तक्रार येथे जेवणासाठी येणाऱ्या पीए स्वीय सहाय्यकांनी केलीय.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला राज्यभरातून आमदार त्यांचे पीए कार्यकर्ते मोठ्या संख्येने आमदार निवासमध्ये राहत असतात. मात्र अशा पद्धतीने जेवणाची गैरसोय होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

SCROLL FOR NEXT