Sujay Vikhe Patil Vs Balasaheb Thorat:  Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'खबरदार! बापाविषयी बोलाल तर..', बाळासाहेब थोरातांच्या लेकीने भाषण गाजवलं, सुजय विखेंना सज्जड दम दिला

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, अहमदनगर

Jayashree Thorat On Sujay Vikhe Patil: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे आता आमदार होणे सुद्धा अवघड झाले आहे. मुख्यमंत्री सोडा, यांच्या नावापुढे आमदार तरी राहतं का? अशी परिस्थिती आहे. माझ्या एकाही कार्यकर्त्याला हात लावायचा प्रयत्न केला तर इथेच येऊनच मी तुम्हाला गाडेल, असे म्हणत भाजप नेते सुजय विखे पाटील यांंनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली होती. विखे पाटलांच्या या टीकेला आता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. खबरदार माझ्या बापाविषयी बोलाल तर.. असा सज्जड दमही त्यांनी दिला.

काय म्हणाल्या जयश्री थोरात?

"विरोधक म्हणतात सगळी पदे घरातच ठेवली. बाळासाहेब थोरात यांचा परिवार म्हणजे संगमनेर तालुका. संगमनेर तालुक्याकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही. हा तालुका तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जेव्हापसून हे खोके सरकार बनलं तेंव्हापासून त्रास चालू केला. बाळासाहेब थोरात यांनी त्यांचं ( विखेंच ) काय वाईट केलं होतं? बाळासाहेब थोरात सर्वात जास्त काळ महसूलमंत्री राहिले, पण कधी कुणाचं वाटोळं केलं नाही, कुणाला त्रास दिला नाही. तुम्ही ज्यांच्यावर टिका करता ते बाळासाहेब थोरात या संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान आहेत. खबरदार, माझ्या बापाविषयी असे काही बोलले तर.." असा सज्जड दम जयश्री थोरात यांनी दिला.

तसेच "तुम्ही ज्यांच्यावर टिका करता ते बाळासाहेब थोरात या संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान आहेत. खबरदार, माझ्या बापाविषयी असे काही बोलले तर. ज्यांना स्वतःच घर सांभाळता येत नाही, ते आपलं घर काय सांभाळणार. आपल्या तालुक्यातील काही टवाळके त्यांच्यासोबत फिरतायत. तुम्ही कुणाला घरात घेताय ते एकदा बघा. बाळासाहेब थोरात यांना पूर्ण देशात मान आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीत मनमोहन सिंग, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासोबत बाळासाहेब थोरात यांचे नाव आहे. ही निवडणूक एकतर्फी करायची आहे. विरोधकांचे डीपॉजिट जप्त झाले पाहिजे.." असा घणाघातही त्यांनी केला.

"जे आपलं वाटोळं करायचं बघत आहेत, त्यांना संगमनेर तालुक्यात एन्ट्री द्यायची नाही. बाळासाहेब थोरात यांची 1985 सालची निवडणूक युवकांनी हाती घेतली होती. आज देखील जे युवक माझ्यासोबत आहेत ते माझे भाऊ आहेत. माझ्या भावांना त्रास द्यायचा नाही. हे बाळासाहेब थोरात यांची सुपुत्री आणि भाऊसाहेब थोरात यांची नात बोलतीये. आपल्याकडे फक्त 30 दिवस, साहेबांची कॉलर टाईट होईल असे काम करायचे आहे..." असे आवाहनही जयश्री थोरात यांनी केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madha Contituency News : बबन शिंदेंची निवडणुकीतून माघार, म्हणाले.. | Video

Maharashtra Politics: परिवर्तन महाशक्तीची पहिली उमेदवार यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उमेदवार देणार

Sangli Vidhan Sabha : सांगलीत भाजप नेत्याचीकडूनच बंडखोरी; अपक्ष लढविणार निवडणूक

Sanjay Raut : शिवसेना स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही; संजय राऊतांचा इशारा कुणाला? VIDEO

Shweta Tiwari: काळजाला भिडणारं सौंदर्य

SCROLL FOR NEXT