High Court News: उद्रेक होणारचं! '५० खोके, एकदम ओके'ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले, याचिका रद्द केली

Maharashtra Politics: सत्तार यांच्या वाहनाच्या ताफ्यावर कापूस व रिकामे खोके फेकले होते. यावेळी ‘50 खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या होत्या.
High Court News: उद्रेक होणारचं! '५० खोके, एकदम ओके'ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले, याचिका रद्द केली
Abdul SattarSaam TV
Published On

सचिन गाड, मुंबई

High Court News: शिवसेनेच्या बंडानंतर चर्चेत आलेल्या ५० खोके, एकदम ओके घोषणेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने एक महत्वाचा निकाल दिला आहे. अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच असे म्हणत ५० खोके, एकदम ओकेची घोषणा देणे म्हणजे गुन्हा नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. तसेच याबाबतचा एफआयआरही रद्द करण्यात आला आहे.

High Court News: उद्रेक होणारचं! '५० खोके, एकदम ओके'ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले, याचिका रद्द केली
Maharashtra Politics: भाजपची ९९ उमेदवारांची पहिली यादी, अहमदनगरमध्ये नाराजी नाट्य; बंडखोरीचा इशारा

काय आहे प्रकरण?

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेले शिवसेनेतील बंड राज्याच्या राजकारणात चांगलेच गाजले. शिंदेंच्या या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या नेत्यांसह कट्टर शिवसैनिकांनी दिलेली ५० खोके, एकदम ओके ही घोषणा चांगलीच गाजली. शिंदेंसोबत असलेले नेते जिथे जातील तिथे त्यांना ठाकरेंच्या शिवसैनिकांचा सामना करताना ही घोषणाबाजी ऐकायला मिळायची. ५० खोके घेऊन ही बंडखोरी केल्याची टीका शिंदेसेनेच्या नेत्यांवर वारंवार होत आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्यासोबतही असाच प्रकार घडला होता. मंत्री अब्दुल सत्तार हे जळगाव जिह्याच्या दौऱ्यावर आले असताना एड. माळी यांच्यासह ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सत्तार यांच्या वाहनाच्या ताफ्यावर कापूस व रिकामे खोके फेकले होते. यावेळी ‘50 खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या, असा ठपका ठेवत शिवसैनिकांसह वकील शरद माळी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.

High Court News: उद्रेक होणारचं! '५० खोके, एकदम ओके'ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले, याचिका रद्द केली
Terrorist Attack: जम्मू-काश्मिरमध्ये भ्याड दहशतवादी हल्ला! कामगारांच्या तळावर अंधाधुंद गोळीबार, डॉक्टरसह ७ जणांचा मृत्यू

कोर्टाने काय म्हटलं?

हा गुन्हा रद्द करण्यासाठी एड शरद माळी यांनी याचिका दाखल केली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ही कारवाई म्हणजे सामाजिक शांतता कायम ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केल्याचा पोलिसांनी दावा केला होता. यावरुनच कोर्टाने नाराजी व्यक्त केली. प्रत्येक आंदोलन हे सामाजिक शांततेचा भंग करण्यासाठी केलेले नसते, असे खडेबोल खंडपीठाने पोलिसांना सुनावले. सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच, असे कोर्टाने म्हटले आहे. तसेच शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यासमोर आंदोलन करणाऱ्या वकिलाविरोधात नोंदवलेला गुन्हाही उच्च न्यायालयाने रद्द केला.

High Court News: उद्रेक होणारचं! '५० खोके, एकदम ओके'ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले, याचिका रद्द केली
Santosh Bangar News: आचारसंहितेचा पहिला दणका! 'फोन पे' प्रकरण अंगलट आलं, शिंदेसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com