Maharashtra Assembly Election 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? अमित शहांच्या भूमिकेने सस्पेन्स वाढला; दिल्लीमधील बैठकीत महत्वाचा निर्णय

Gangappa Pujari

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच राजकीय घडामोडी वेग आला आहे. विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडी तसेच महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जोर बैठकांचे सत्र सुरु आहे. या संदर्भात दिल्लीमध्ये शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील जागा वाटप, तसेच महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत झालेल्या चर्चेची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.

महायुतीच्या जागावाटपात मुंबई शहरातील ३६ जागांचा तिढा सुटल्याची महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई शहरातील ३६ विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक मतदारसंघ भाजपला मिळणार आहेत. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारसंघ मिळणार आहेत. यामध्ये मुंबईमधील ३६ विधानसभा जागांपैकी १८ जागा भाजपच्या वाट्याला, शिवसेना १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबतही एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री पदाच्या बाबत अमित शाह यांनी 'वेट अँड वॉचची' भूमिका घेतली असून कालच्या बैठकीत मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब झाले नसल्याचे समोर आले आहे. महायुतीमध्ये ज्यांच्या जास्त जागा त्यांनाच मुख्यमंत्री पद मिळणार असून विधानसभा निवडणुका मात्र एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढल्या जाणार असल्याची चर्चा झाली आहे.

दरम्यान, महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाजपच बाहुबली ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमित शाह यांच्या सोबत झालेल्या कालच्या बैठकीत जागावाटपाच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजप विधानसभा निवडणुकीत 155 पेक्षा अधिक जागा लढणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 70 पेक्षा अधिक तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 60 जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील 24 तासात जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : 'ते निष्ठावानांना सतरंज्याच उचलायला लावणार'; शिरसाटांचा ठाकरेंना टोला

Goa : गोव्याला बीचवर फिरून कंटाळलात? मग घ्या इतिहासाचा अनुभव

Health Tips: तुम्हाला सतत थकवा जाणवतोय? तर करा 'या' टेस्ट नाहीतर...

Vastu Tips : चुकूनही 'या' दिशेला डोके ठेवून झोपू नका, नाहीतर पैशांची टंचाई भासेल

Maharashtra Politics: नागपूर दक्षिणच्या जागेवरुन 'मविआ'त वाद पेटला! ठाकरे गटाचा दावा; काँग्रेसचा सामुहिक राजीनाम्याचा इशारा

SCROLL FOR NEXT