Sillod Vidhan Sabha : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या; सिल्लोडमध्ये भाजपच्या दिग्गजाच्या हाती मशाल, आज पक्ष प्रवेश!

Sillod News : सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. अब्दुल सत्तार यांनी या मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून येत आमदारकीची हॅक्ट्रिक
Sillod Vidhan Sabha
Sillod Vidhan SabhaSaam tv
Published On

सिल्लोड : विधानसभेचे आचारसंहिता लागताच संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड- सोयगाव मतदारसंघात मंत्री अब्दुल सत्तार विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटांनी दंड थोपटले आहेत. त्यासाठी भाजपमध्ये नाराज असलेले प्रमुख पदाधिकारी आज ठाकरे शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. २०० पेक्षा जास्त गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना होणार आहेत. उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर ते अब्दुल सत्तार यांच्या विरोधात रिंगणात उतरणार आहेत. 

सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी (BJP) भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. अब्दुल सत्तार यांनी या मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून येत आमदारकीची हॅक्ट्रिक केली आहे. तसेच या विधानसभेतही विजय व्हावा; यासाठी सत्तार तयारीला लागले होते. पण यंदाची विधानसभा निवडणूक सत्तार (Abdul Sattar) यांच्यासाठी सोपी मानली जात नाही. कारण भाजपचेच प्रदेश चिटणीस सुरेश बनकर हे आज मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधणार आहेत. त्यामुळे सिल्लोडमध्ये भाजपला मोठी खिंडार पडणार आहे. 

Sillod Vidhan Sabha
Kalyan Politics : कल्याण पूर्वेत महायुतीत टेन्शन वाढलं; शिवसेना शहर प्रमुखांचे बंडाचे संकेत

मागील पंधरा वर्षांपासून या मतदारसंघावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. स्थानिक भाजपचे पदाधिकारी, नेते विरुद्ध अब्दुल सत्तार असा संघर्ष गेल्या काही महिन्यांपासून वाढला आहे. अशामध्ये युती असल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे भाजपचे वरिष्ठ नेते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आता एकेक पदाधिकारी शिवसेना उद्धव ठाकरे गटात सहभागी होणार अशी चर्चा आहे. सिल्लोड सोयगाव मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून अब्दुल सत्तारांच्या मित्र पक्षाकडूनच अडचणी वाढणार आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com