ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्हाला योग्य आराम मिळत असताना सुद्धा थकवा येत असेल किंवा काम करताना उत्साह जात असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.
प्रत्येकाच्या शरीरात हिमोग्लोबीन ऑक्सिजन घेवून जाण्याचे काम करते. मात्र शरीरातले हिमोग्लोबीन कमी झाल्यास आपल्याला जास्त प्रमाणात थकवा येतो.
अशक्तपणा, थकवा या समस्यांपासून लांब राहायचे असेल तर तुम्ही हिमोग्लोबीन चेक करणे आवश्यक आहे.
तुमच्या शरीरात आयरनच्या कमीमुळे तुम्ही जास्त थकवा जाणवत असू शकता.
त्यामुळे तुम्ही आयरनची तपासणी करणे महत्वाचे आहे. त्याचसोबत तुम्ही पोष्टीक आहार घेणे सुद्धा महत्वाचे आहे.
फेरिटिनची पातळी
तुमच्या शरीरातले हिमोग्लोबीन आणि आयरन या दोन्हीची कमी असल्याचे जाणवल्यास तुम्ही 'फेरिटिनची पातळी तपासणे महत्वाचे आहे.
या महत्वाच्या गोष्टींची कमी शरीरात असल्याने आपल्याला सतत चक्कर येणे, सतत झोप येणे, थकवा येणे या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणून या पद्धतीच्या टेस्ट महत्वाच्या आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.