VIDEO : 'ते निष्ठावानांना सतरंज्याच उचलायला लावणार'; शिरसाटांचा ठाकरेंना टोला

Sanjay Shirsat Statement On Thackrey Group : अजय चौधरी आणि प्रकाश फातर्फेकर यांना बैठकीत मातोश्रीवर बोलावल नसल्याने आता यावरून राजकारण सुरू झालं आहे. शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी यावरून ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

मातोश्रीवर झालेल्या आमदारांच्या बैठकीत अजय चौधरी आणि प्रकाश फातर्फेकर यांना बोलवण्यात आलेलं नव्हतं, त्यामुळे या दोघांची उमेदवारी धोक्यात आली आहे का? अशा चर्चा रंगल्या आहेत. तर चौधरी हे गट नेते असल्याने त्यांच्याविषयी अफवा पसरवल्या जात असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. तर यावर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी टीका करत उद्धव ठाकरे यांना इतर पक्षातले गद्दार आता निष्ठावान वाटायला लागले आहेत. आपल्या पक्षातल्या निष्ठावनांना ते सतरंज्या उचलायला लावणार आहेत, अशी टीका शिरसाट यांनी केली आहे. उबाठाला असे वाटत होते की आमच्यामुळे इतर पक्ष चालत आहेत, त्यांना काँग्रेसने चांगली चपराक दिली आहे. माईक खेचाताणीपर्यंत त्यांचा प्रकार गेला आहे. शिवसेना प्रमुखांनी तयार केलेल्या नेत्यांची अशी अवस्था काल महाराष्ट्राने अनुभवली म्हणत शिंदेंचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com