Properties linked to fake godman Ashok Kharat come under scrutiny as Income Tax joins SIT probe into his alleged ₹1500 crore empire. Saam Tv
महाराष्ट्र

भोंदू खरातचा पाय आणखी खोलात, SIT पाठोपाठ आयकरच्याही रडारवर?

₹1500 Crore Empire of AKharat Exposed: भोंदू खरातच्या काळ्या कारनाम्यांची मालिका काही थांबत नाही.. त्यामुळे आता एसआयटीपाठोपाठ खरात आयकरच्याही रडारवर आलाय... त्याचं नेमकं कारण काय?, खरातकडे किती हजार कोटींची संपत्ती आहे? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Saam Tv

विकृत भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरला आहे. या नराधमाचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. अटकेनंतर त्याच्या चौकशीत अनेक काळे धंदे समोर येतायेत. आयकर विभाग भोंदू खरातच्या भक्तांनी दिलेल्या देणग्या, महिलांकडून घेतलेली फी यांची तपासणी करणार आहे.. त्याच्या काळ्या धंद्यांना आर्थिक मदत करणाऱ्या व्यक्ती, संस्था एवढंच नाही तर खरातच्या संपत्तीतील भागिदारांची चौकशी करण्यात येणार आहे... यात बँक खात्यातील मोठ्या रकमांच्या जमा-खर्चाची छाननी, जमीन खरेदी-विक्री, ट्रस्ट आणि कंपनीद्वारे केलेल्या व्यवहार आणि लिंकिंगची चौकशी कऱण्यात येणार आहे..

खरातकडे अनेक सातबारा आढळून आलेत. अनेक अधिकारी त्याच्या संपत्तीत सहमालक आहेत. एवढंच नाही तर खरातचं कनेक्शन नावाजलेल्या बांधकाम कंपन्यांसोबतही असल्याची माहिती समोर आलीय.. या काळ्या साम्राज्याचं जाळं किती विस्तारलंय ?पाहूयात... भोंदू खरातची नाशिकच्या पाथर्डी भागात 150 कोटींची 30 एकर जमीन आहे.. तर मिरगाव आणि कहाळवाडीत 2 कोटींची 45 एकर जमीन आहे. ओझर विमानतळाजवळ 5 कोटींची जमीन खरेदी केलीय. गौळाणे परिसरातही खरातच्या कुटुंबाने 30 कोटींची जमीन विकत घेतलीय. तर शिर्डीत साई मंदिरापासून दीड किलोमीटर अंतरावर 50 कोटींचा 4 एकर भुखंड घेतलाय... दुसरीकडे नाशिकच्या कर्मयोगीनगरला अलिशान बंगला आणि 5 कोटींचं कार्यालय आहे. तर मिरगावला 13 कोटी किंमतीचं फार्म हाऊस आहे.

समस्या सोडवण्याच्या आमिषाने महिलांचं शोषण करत उभं केलेल्या काळ्या साम्राज्याला सुरुंग लावायचा हवा. कारण खरातच्या संपत्तीत नेते आणि अधिकाऱ्यांचं कनेक्शन असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एसआयटीसोबत फक्त आयकर विभागच नाही तर ईडीनेही चौकशी करायला हवी. खरात सारख्या भोंदूबाबाला बळ देणारे अधिकारी, राजकीय नेते यांचीही चौकशी होऊन अशा विकृत प्रवृत्तीला कायमचं ठेचायला हवं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

SCROLL FOR NEXT