High-value properties in Pune’s Koregaon Park linked to CA in Kharat case raise suspicion. saam tv
महाराष्ट्र

Ashok Kharat CA: पुण्यातील कोरेगाव पार्कात 18 रो हाऊस, 49 गुंठे जागा; अशोक खरातच्या सीएची संपत्ती ऐकून बसेल धक्का

Ashok Kharat CA Property : अशोक खरातच्या सीए प्रकाश पोफळे यांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेची माहिती समोर आली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात १८ रो हाऊस आणि ४९ गुंठे जागा खरेदी केली असल्याची बाब उघडकीस आली आहे.

Bharat Jadhav

  • सीए प्रकाश पोफळे यांच्या मालमत्तेचा खुलासा

  • कोरेगाव पार्कमध्ये १८ रो हाऊस खरेदी

  • सीए पोफळे हा खरातच्या सर्व काळ्या पैशांचे आणि गुंतवणुकीचे नियोजन करत होता.

नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. आता खरात प्रकरणातील नवी अपडेट समोर आली आहे. खरातचा सीए प्रकाश पोफळे यांच्या संपत्तीचा आकडा समोर आला आहे. सीए प्रकाश पोफळेची संपत्ती ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुण्यातील सर्वात महागड्या भागांपैकी एक असलेल्या या भागात प्रकाश पोफळेने २०२४ मध्ये १८ रो हाऊससेस, ४९ गुंठे जागेसह खरेदी केली. कागदोपत्री याची किंमत १९ कोटी ५६ लाख रुपये दाखवण्यात आली आहे.

मात्र या मालमत्तेची किंमत शंभर कोटींपेक्षा अधिक असल्याचे सांगितलं जात आहे. यामुळे अशोक खरातच्या सीएकडे इतके पैसे कुठून आले?, खरात सीएमार्फत काळा पैसा पांढरा करत होता का? अशोक खरातचा या व्यवहाराशी संबंध आहे का? एसआयटीकडून चौकशी होणार आहे का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये मालमत्ता

तपासादरम्यान खरात आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या नावावर तब्बल १८ रो-हाऊस असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत. नाशिक आणि आसपासच्या परिसरात सुमारे ४९ गुंठे मोकळी जागा/जमीन असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. सीए पोफळे हा खरातच्या सर्व काळ्या पैशांचे आणि गुंतवणुकीचे नियोजन करत होता असा संशय पोलिसांना आहे.

'शिवनिका' ट्रस्ट आणि इतर व्यवहारांमधून जमा झालेला पैसा या मालमत्तांमध्ये गुंतवण्यात आला असावा अशी शक्यता आहे. या सर्व मालमत्तांची खरेदी कधी झाली, त्यासाठी पैसे कुठून आले आणि यामध्ये बेनामी व्यवहार झाले आहेत का? याचा तपास आता विशेष तपास पथक करत आहे.

आऊट डोअर व्हिजीटसाठी लाखो रुपयांची फी

मंत्र-तंत्राच्या नावाखाली विकृत आणि भोंदू अशोक खरातने सामान्य नागरिकांसह मोठ्या उद्योजकांचीही फसवणूक केल्याचं समोर आले आहे. भोंदू खरातचे अनेक भक्त, त्यांच्यापैकी काहींना त्याचा सल्ला, मार्गदर्शन हवा असायचा. त्यासाठी ते लोकं त्याला आपल्या घरी बोलवायचे. व्यवसाय जिथे चालतो तिथे नेत. त्या ठिकाणी जाण्यासाठी खरात त्या लोकांकडून ५ लाख रुपये इतकी फी घेत असायचा. जी व्यक्ती जास्त पैसे देईल, भोंदू खरात हा त्याच्यासोबत जायचा असंही एसआयटी तपासातून आता उघड झालं आहे.

नाशिकच नव्हे, मुंबई, पुण्यातही प्रॉपर्टी

अशोक खरातची संपत्ती २०० नाही तर तब्बल २ हजार कोटींच्या घरात असल्याचं समोर आले आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे खरातच्या नावावर ३३ एकर जमीन आणि एक फार्महाऊस आहे. नाशिकमधील पाथर्डी आणि गवाणे गावात १० एकर जमीन, तर सिन्नरमध्ये ६ एकर जमीनही त्याच्या नावावर आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे साडेचार एकर आणि शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे सव्वा पाच एकर जमीन त्याच्या नावावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पाऊस

Honey Singh Case: हनी सिंगला कॉन्सर्टमध्ये घडलेल्या 'त्या' प्रकारावरुन मिळाली वॉर्निंग; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

ओटीपी दिला आणि ओला कार लहान बहिणीला घेऊन निघाली अन् पुढं काय घडलं?

नरहरी झिरवाळ व्हिडिओ प्रकरणात ट्विस्ट, तृतीयपंथी थेट पोलिसांत पोहचली अन् दिली तक्रार, वाचा अपडेट

RBI Account Portability: अकाउंट नंबर तोच राहणार पण बँक बदलणार; RBI नवीन सुविधा करणार सुरु

SCROLL FOR NEXT