ashok kharat exploitation case Saam tv
महाराष्ट्र

Ashok Kharat: माझा नवरा ज्योतिषी नाही, पण...; अशोक खरातच्या अटकेनंतर बायकोची पहिली प्रतिक्रिया

Ashok Kharat Exploitation Case: भोंदूबाबा अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याची बायको कल्पना खरातची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. माझा नवरा ज्योतिषी नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप देखील केले.

Priya More

Summary -

  • अशोक खरातच्या अटकेनंतर बायकोची पहिली प्रतिक्रिया

  • नवऱ्याविरोधात कट रचल्याचा आरोप

  • एसआयटीकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू

  • या प्रकरणामुळे राजकारण तापले

भोंदूबाबा आणि ज्योतिषी अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. अशोक खरातने १०० पेक्षा अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होत असून या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी खरातच्या पेनड्राईव्ह जप्त केला असून त्यामध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले आहेत. खरात प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. पोलिस सर्व बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत. आता त्याची बायको कल्पना खरातने याप्रकरणात पहिली प्रतिक्रिया दिली असून तिने अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत.

हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत संतोष खरातची बायको कल्पना यांनी सांगितले की, माझा नवरा काही व्यावसायिक किंवा तज्ज्ञ ज्योतिषी नाहीत. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी त्यांचा घात केला असून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांची प्रतिमा उद्ध्वस्त करण्यासाठी हे कारस्थान रचले गेले आहे.' कल्पना खरात यांनी कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतले नाही. अशोक खरातच्या जवळच्या व्यक्तींनी देखील मौन बाळगले आहे.

अशोक खरात आणि कल्पना खरात हे नवरा-बायको स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू म्हणून समाजात वावरतात. गुरूपौर्णिमेनिमित्त या नवरा-बायकोचे पाद्यपुजन सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले होते. अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधक या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

दरम्यान, याप्रकरणी भोंदूबाबा अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आता खरातच्या मिरगावमधील ईशान्येश्वर मंदिरातील पुजाऱ्याची चौकशी होणार आहे. मिरगावच्या फॉर्म हाऊसवरील कामगारांची देखील चौकशी केली जाणार आहे. पुजारी आणि कामगारांच्या चौकशीतून फॉर्म हाउसवर काय कारनामे चालायचे याचा खुलासा होणार आहे. पुजारी, कामगार आणि अशोक खरातची एकत्रित चौकशी होण्याची शक्यता आहे. या चौकशीतून अशोक खरातचे आणखी कारनामे समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fancy Blouse Designs: 'परी म्हणू की सुंदरा' हे 5 ब्लाऊज पॅटर्न तुमच्या सौंदर्याला लावतील चार चाँद

Maharashtra Live News Update: मनसेची उद्या मुंबईत बैठक

उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराला पोलिसांची नोटिस; राजकीय वर्तुळात खळबळ

Maratha History: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इंधन म्हणून कशाचा वापर केला जायचा?

Ashok Kharat: पतीला बाहेर बसवायचा आणि केबिनमध्ये गर्भवती महिलेसोबत...; खरातचा आणखी एक कारनामा आला समोर

SCROLL FOR NEXT