Ashok Kharat Case  
महाराष्ट्र

Ashok Kharat Case: नगरसेवक होऊ शकत नाही, बुवाबाजी करून आमदार, मंत्री व्हायचंय; भाजपच्या महिला नेत्याचा रोख कुणाकडे?

Manda Mhatre statement on Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणावरून भाजप आमदार मंदा म्हात्रे संतप्त झाल्या आहेत. त्यांनी या प्रकरणात ज्या राजकीय नेत्यांची नावं समोर आली आहेत त्यांच्यावर सडकून टीका केली.

Priya More

Summary -

  • अशोक खरात प्रकरणावरून राजकारण तापले

  • भाजप आमदार मंदा म्हात्रेंची सडकून टीका

  • अशोक खरात प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे कनेक्शन उघड

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोग्याचे अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावे लागला. आता या प्रकरणात अनेक मंत्री आणि आमदारांची नावं समोर येत आहेत. या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट मंत्री आणि आमदारांच्या राजीनाम्याची मागणी केली. आता सत्ताधारी पक्ष भाजपच्या महिला नेत्यानेच अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया देत या प्रकरणात अडलेल्या मंत्री आणि आमदारांवर सडकून टीका केली आहे. 'ते नगरसेवकही होऊ शकत नाही. पण यांना बुवाबाजी करून आमदार आणि मंत्री व्हायचं आहे.', अशा शब्दात भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी सडकून टीका केली.

मंदा म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'आमच्यासारख्या महिला ३५- ३५ वर्षे समाजसेवेच्या माध्यमातून काम करतोय. पण काल आलेल्या महिला ताबडतोब आमदार- मंत्री होतात. राष्ट्रवादीत मी १७ वर्षे काम केले. पूर्ण महाराष्ट्र पिंजला. त्यावेळी माझे पाय गेले. मला वाटलं होतं की मी आमदार होईल, मंत्री होईल.पण नको तीच लोकं आमदार आणि मंत्री झाले अशी परिस्थिती आहे. पण आज या राज्याचे मुख्यमंत्री हुशार आहेत. कुणी कितीही चमचेगिरी केली तरी ते माणसं ओळखतात आणि ज्याला जी शिक्षा द्यायची आहे ती ते दिल्याशिवाय राहणार नाहीत.'

भोंदूबाबा अशोक खरातसोबत काही राजकारणी लोकांचे कनेक्शन आहे. यावर प्रतक्रिया देताना मंदा म्हात्रे म्हणाल्या की, ' मी या कृत्याचा निषेध करते. लाज वाटते मला की मी राजकारणी एक महिला आहे. अशापद्धतीने राजकारणातील महिलांना अशा महिलांमुळे बदनाम केले जाते. मला कुणी महाराज-बुवा माहिती नाहीत. माझ्यासाठी माझे आई-वडीलच गुरू आहेत. मला या महिलांना हे सांगावेसे वाटते की, तुम्ही कधी सासू- सासर्‍यांचे पाय धुतले का? तुम्ही कधी आई-वडिलांची पाय धुतले का? तुम्ही कधी आई-वडिलांच्या पायाचे तीर्थ प्यायले का? सुसंस्कृत आणि सुशिक्षित महिलांचे जेव्हा चित्र टिव्हीवर बघतो तेव्हा हसावे की रडावे कळत नाही.'

बुवाबाजी करून यांना आमदार आणि मंत्री व्हायचंय अशी टीका करत मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, 'मला असे वाटते आई-वडील आणि सासू-सासऱ्यांची सेवा करा. तरच तुम्हाला आमच्यासारखे इथपर्यंत जाता येईल. आम्ही उगाच नाही चार वेळा निवडून आलो. आमच्या कतृत्व आणि कामाने निवडून आलो. त्याची दखल आमच्या भारतीय जनात पार्टीने घेतली. या महिला नगरसेविका सुद्धा बनू शकत नाही. काढा त्यांचा इतिसाह. पण यांना बुवाबाजी करून आमदार व्हायचंय, मंत्री व्हायचे आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संगमनेर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

Super El Nino: चिंता वाढली! जगावर 'सुपर एल निनो'चं महासंकट, NASAचा धडकी भरवणारा फोटो; भारतावर काय परिणाम होणार?

Singer Death : संगीतविश्वाला मोठा धक्का; ज्येष्ठ गायिकेचे निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

Sanjay Raut: “२०२९ पर्यंतची गॅरंटी कोण देणार? शिंदे तरी राहतील का?” संजय राऊतांची जोरदार टीका

फ्लॅटधारकांसाठी मोठी बातमी! मेन्टेनन्सची कटकट संपणार; राज्य सरकारचा नवा ऐतिहासिक नियम तयार

SCROLL FOR NEXT