SIT officials intensify investigation in the Ashok Kharat case as new revelations emerge from the son’s interrogation. Saam Tv
महाराष्ट्र

वडील तंत्र-मंत्र करायचे का? भेटायला कोण कोण यायचं? खरातच्या मुलाला SIT ने काय काय प्रश्न विचारले?

Ashok Kharat Case SIT Interrogation Details: अशोक खरात प्रकरणात SIT चौकशीत मुलाने दिलेल्या कबुलीजबाबामुळे हवाला रॅकेटचा संशय बळावला आहे. पत्नी कल्पना खरात फरार असून तपास अधिक गडद झाला आहे.

Omkar Sonawane

राज्यात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात अत्यंत महत्वाचे आणि धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. विशेष तपास पथकाने केलेल्या चौकशीत खरातच्या कबुलीजबाबामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, SIT ने खरातच्या मुलाला ताब्यात घेऊन सखोल चौकशीदरम्यान अनेक प्रश्न विचारले, वडिलांना भेटायला कोण येत होते? बहिणीच्या लग्नात किती सोने घेतले? घरातील खर्च कसा चालायचा? आई पैसे कुणाकडे देत असे? तसेच परदेश दौरे आणि तंत्रमंत्राच्या संदर्भातील प्रश्नांचा भडिमार करण्यात आला.

खरातच्या मुलावर पोलिसांची प्रश्नांची सरबत्ती

मात्र या सर्व प्रश्नांना मुलाने एकच उत्तर दिले. सर्व डॅडला माहिती. तरीही घरात खूप कॅश यायची अशी महत्वाची कबुली त्याने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कबुलीमुळे अशोक खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची शक्यता अधिक बळावली आहे. गरज भासल्यास मुलाची पुन्हा चौकशी होऊ शकते, असे ही सांगितले जात आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात सध्या फरार असून तिच्या कुटुंबियांचीही SIT कडून चौकशी करण्यात आली आहे. सिन्नर तालुक्यातील पाडळी गावातील तिच्या माहेरी जाऊन तपास करण्यात आला.

कल्पना खरात गेल्या तब्बल १६ वर्षांपासून माहेराशी कोणताही संपर्क ठेवलेला नाही. वडील आणि भावाच्या निधनावेळीही ती माहेरी गेली नसल्याचे समोर आले आहे. तिच्या माहेरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून कुटुंबीय शेतीवर उदरनिर्वाह करत असल्याची माहिती आहे. या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही, असा दावा नातेवाईकांनी केला आहे. सध्या कल्पना खरात फरार असून शिर्डी पोलिसांनी तिच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

Maharashtra News Live Update: पुणे विषारी दारू प्रकरण, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

Avoiding Chips and Cold Drink: चिप्स खाणं आणि कोल्ड ड्रिंक्स पीणं २१ दिवस बंद केल्यावर शरिरावर काय परिणाम होतो?

Manoj Jarange: मोठी बातमी! २ तासांच्या चर्चेनंतरही तोडगा नाही, मनोज जरांगे उपोषणावर ठाम

SCROLL FOR NEXT