Ashok Kharat case  saamtv
महाराष्ट्र

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Nashik Ashok Kharat Case Update: नाशिकच्या अशोक खरातचे आणखी एक कांड समोर आले आहे. खरातने उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस तपास करत आहेत.

Priya More

Summary:

  • नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी अपडे

  • अशोक खरातने उरणमध्ये स्वस्तात खरेदी केली जमीन

  • ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरातच्या आणखी एका नवीन कांडाविषयी पोलिस तपासातून माहिती मिळाली. अशोक खरातने उरणमधील चाणके येथे ५८.५० लाखांत जमीन खरेदी केली. बाजारभाव ३ ते ४ कोटी असताना ऐवढ्या स्वस्तात व्यवहार झाला त्यामुळे अशोक खरातच्या जमीन व्यवहारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अशोक खरातला ज्या दिवशी अटक करण्यात आली या दिवशीच म्हणजेच १७ मार्चला या जमीन व्यवहाराची व्यवहाराची नोटीस प्रसिद्ध झाली. कोठडीत असतानाही महिनाभरात १३ एप्रिलला फेरफार नोंद मंजूर झाली. अशोक खरातचा प्रस्तावित तिसऱ्या मुंबईवर डोळा होता हे तपासातून आता उघड झाले आहे. अशोक खरातची याआधी पुण्यातील आणि सोलापूरातील जमीन व्यवहाराची माहिती समोर आली होती.

भोंदू अशोक खरातच्या मुलाची पुन्हा एसआयटीकडून चौकशी झाली. हर्षवर्धन खरातचा एसआयटी अधिकाऱ्यांनी जबाब नोंदवला. फरार कल्पना खरात कुठे आहे? याची माहिती आहे का ? हे जाणून घेण्यासाठी हर्षवर्धनला पुन्हा एसआयटीने ताब्यात घेतले होते. खरातच्या आर्थिक व्यवहारांच्या संबंधित माहिती घेण्यासाठी हर्षवर्धन खरातची कसून चौकशी करण्यात आली.

अशोक खरातच्या अनेक प्रॉपर्टीमध्ये हर्षवर्धन खरात हा वारस असल्याने त्याला या व्यवहारांची माहिती होती का? असे विविध प्रश्न हर्षवर्धन खरात याला एसआयटी कडून विचारण्यात आले. या व्यवहारांबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याची माहिती हर्षवर्धन खरात याने दिल्याची माहिती समोर आली. या चौकशीनंतर हर्षवर्धन खरातला सोडून देण्यात आलं.

दरम्यान, भोंदू अशोक खरातला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात काल अशोक खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.महिला अत्याचाराच्या सहाव्या गुन्ह्यात एसआयटीने पुन्हा घेतला अशोक खरातचा ताबा घेतला. सहाव्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आज पुन्हा कोर्टाकडे पोलिस कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

Accident : हृदयद्रावक! काही दिवसांवर लग्न, पत्रिका वाटण्यासाठी जाताना भरधाव कारने चिरडले; नवरदेवासह दोघांचा मृत्यू

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

SCROLL FOR NEXT