ashok chavan, kolhapur saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation : कितीही बैठका घ्या... मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटणार नाही; अशोक चव्हाणांनी राज्य सरकारला सुनावले

यावेळी आमदार सतेज पाटील आमदार पी. एन. पाटील, राजू बाबा आवळे, आमदार जयश्री जाधव उपस्थित होते.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : मुंबईत 10 बैठका घ्या अन्यथा त्या बैठकीला कोणालाही बोलवा जोपर्यंत केंद्रात इंदिरा सहानी केसमध्ये 50 टक्क्याच्या आरक्षणाच्या मर्यादेत बदल होतं नाही तोपर्यंत हा मुद्दा सुटणार नाही असा सल्ला काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (congress leader ashok chavan) यांनी राज्य सरकारला दिला. ते कोल्हापुरात (kolhapur) डी. डी. आसगावकर शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विकास ट्रस्टच्या सत्कार समारंभा प्रसंगी बोलत होते. (Maharashtra News)

अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारला अनेक मुद्यावरून सुनावले. ते म्हणाले मराठा आरक्षणाच्या बैठका महाराष्ट्रात घेण्यापेक्षा दिल्लीत घ्या मराठा आरक्षणाचा मुद्दा मी जवळून हाताळलेला आहे.

इंदिरा सहानी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा केंद्र सरकार जोपर्यंत घटना दुरुस्ती करून करत नाही तोपर्यंत हा मुद्दा सुटणार नाही. त्यामळे मुंबईत 10 बैठका घेऊनही काही होणार नसल्याचा टोला चव्हाण यांनी सरकारला लागवला.

दरम्यान त्यांनी फक्त भगवान सरकार म्हणून चालणार नाही तर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. राज्याच्या आर्थिक विकासाचं गाङ बिघडलं असल्याची टीका चव्हाण यांनी यावेळी केली.

दरम्यान प्रारंभी डी. डी. आसगावकर शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा विकास ट्रस्ट संचलित मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने शासकीय विभागात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, राजू बाबा आवळे, आमदार जयश्री जाधव उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

SCROLL FOR NEXT