ASHOK CHAVAN VIRAL AUDIO CLIP saam tv
महाराष्ट्र

दोन दिवस शांत राहा अन् शिव्या खा! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा कार्यकर्त्याला सल्ला

Ashok Chavan Viral Audio Clip On Mudkhed Drought List: मुदखेड तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळल्याने नाराजी व्यक्त होत असतानाच अशोक चव्हाण आणि एका कार्यकर्त्याच्या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Omkar Sonawane

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड जिल्ह्यातून मुदखेड तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळल्याने माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं समोर आलंय. अशोक चव्हाण आणि त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालीय. या क्लिपमध्ये मुदखेड तालुका दुष्काळाच्या यादीतून का वगळण्यात आला असा जाब अशोक चव्हाण यांना कार्यकर्ता विचारत आहे. 24 तासही झाले नाही आणि बोंबाबोंब सुरू आहे, असं अशोक चव्हाण या कार्यकर्त्याला म्हणाले. अशोक चव्हाण यांनी या कार्यकर्त्याला दोन दिवस शांत राहण्याचा आणि शिव्या खाण्याचा सल्ला दिल्याचं या ऑडिओ क्लिप मध्ये ऐकायला मिळत आहे.

माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण आणि कार्यकर्ता यांच्यातील नेमका काय संवाद आहे पाहुयात

कार्यकर्ता:- साहेब राम राम हो.

अशोक चव्हाण:- बोला ना काळजी करू नका. मुदखेड तालुका 100% दुष्काळ यादीत येईल. काळजी करू नका.

कार्यकर्ता:- काय काळजी करू नका सर.असं असते का, आता आम्ही कार्यकर्ते जुने.

अशोक चव्हाण:-हा हा.....

कार्यकर्ता:- आम्हाला तोंड काढायला जागा नाही कुठं. जागेजागेवर शिव्या देताय लोक, आपला तालुका कशामुळं वगळला?

अशोक चव्हाण:- अरे थोडं थांब, थांबा ना एव्हढी घाई का लागली.

कर्यकर्ता:- तसं नसते साहेब याचं रिजन तर द्यावं लागल ना, त्याला कशामुळं वगळला ते

अशोक चव्हाण:- आ आ.....

कर्यकर्ता:- याच रिजन तर द्यावं लागेल ना कशामुळं वगळला ते.

अशोक चव्हाण:- कारण द्यायची गरज आहे का त्यांना? कारण द्यायची गरज आहे का हो?

कार्यकर्ता:- अहो पण, अख्या महाराष्ट्रातले एवढे तालुके घेतले आणि आपले दोन तालुके कशामुळे वगळले?

अशोक चव्हाण:- अरे विश्वास तर ठेवा. तुम्हाला कळते तर मला कळत नाही का हो. तुमचंच काहीतरी बोलत राहता. 24 तास झाले नाहीत बोंबा बोंब. आता पर्यंत काही केलंच नाही का आम्ही?

कार्यकर्ता:- अहो साहेब तुम्हाला कळते तेव्हढं आम्हाला कळत नाही. पण कारण काय म्हणायलो वागळण्याचं.

अशोक चव्हाण:- थांबा जारा शांत रहा शिव्या खा. हरकत नाही.

दरम्यान या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

ज्ञानेश कुमारांकडून भाजपच्या तिकीटाची ऑफर; केरळच्या माजी सचिवांचा खळबळजनक दावा

राजकीय वर्तुळात पितृपक्ष सुरू; भाजप, राष्ट्रावादीसह अनेक राजकीय पक्षांनी घेतला मोठा निर्णय

तर मंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही; शिंदेंचा सरकारला मोठा इशारा|VIDEO

Maharashtra News Live Update: साताऱ्यात भीषण अपघात, पर्यटकाच्या बसचा ब्रेक फेल

SCROLL FOR NEXT