CM Devendra Fadnavis honors Nashik’s Ugale couple after Ashadhi Ekadashi Vitthal Puja at Pandharpur temple. Saam TV News Marathi
महाराष्ट्र

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

Nashik’s Ugale couple : नाशिकच्या उगले दाम्पत्याला आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेसाठी मान मिळाला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार व एक वर्षासाठी मोफत एसटी पास जाहीर करण्यात आला.

Namdeo Kumbhar

Ugale couple from Nashik honored with government : दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला पंढरीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय पूजा थाटामाटात पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे शासकीय पूजा संपन्न झाली. या शासकीय पूजेचा मान यंदा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील शेतकरी दाम्पत्य कैलास उगले आणि कल्पना उगले यांना मिळाला. या दाम्पत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पांडुरंगाची पूजा करण्याची संधी मिळाली. पूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उगले दाम्पत्याचा सत्कार केला. त्यांना सन्मानित केल्यानंतर उगले दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांनी एक वर्षासाठी मोफत एसटी प्रवासाची सवलत जाहीर केली आहे. उगले दाम्पत्य पुढील वर्षभर महाराष्ट्र महामंडळाच्या एसटी बसने मोफत प्रवास करू शकतात.

महाराष्ट्रातील वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशी हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी शासकीय पूजेचा मान मिळणे ही प्रत्येक वारकऱ्याची स्वप्नवत बाब मानली जाते. यंदा हा मान मिळाल्याने उगले दाम्पत्य आनंदाने भारावले आहे. 'काय बोलावं, काहीच समजत नाही. खूप आनंद झाला आहे. आमचा नंबर लागेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, अशी भावना कैलास उगले यांनी व्यक्त केली.' तर, “फडणवीस साहेबांसोबत विठ्ठलाचं दर्शन आणि पूजा करण्याची संधी मिळेल, असं कधीच वाटलं नव्हतं. मी भगवंतासमोर आहे, हीच खूप मोठी गोष्ट आहे,” असे म्हणत कल्पना उगले यांनी आपला आनंद व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाची पूजा करायला मिळणे हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे. दिंड्या सोबत अनेक वारकरी स्वयंप्रेरणेने पायी चालत आले. वारीत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंग पाहतो, ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेही नाही. वारीत हरीनाम गजर करतांना नवी ऊर्जा मिळते. वारीने खऱ्या अर्थाने भागवत धर्माची पताका उंचावत ठेवली आहे. ही आपली संस्कृती अलौकिक आहे असे सांगून मानाच्या वारकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो, अशी सदिच्छा फडणवीस यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

Pune News: पुण्यात दिवसभरात दुसरी आत्महत्या; तृतीयपंथीनं खडकवासला धरणात उडी मारून मृत्यूला कवटाळलं

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

SCROLL FOR NEXT