AIMIM President Asaduddin Owaisi addressing the media in Sambhajinagar regarding the arrest of Nida Khan in the Nashik TCS conversion case. saam tv
महाराष्ट्र

TCS Case: घरात बुरखा आणि धार्मिक पुस्तके सापडणे कधीपासून अवैध झाले? असदुद्दीन ओवेसींकडून निदा खानचं समर्थन

Asaduddin Owaisi: नाशिक येथील टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील संशयित निदा खानची असदउद्दीन ओवेसींनी पाठराखण केली आहे. घरात बुरखा किंवा धार्मिक पुस्तक असणे हा गुन्हा कधीपासून झाला? असा सवाल ओवेसींनी विचारला असून याला राजकीय षडयंत्र म्हटले आहे.

Omkar Sonawane

नाशिकच्या TCS धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खान हिला संभाजीनगर येथून दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे ती, तिची आई आणि मावशी हे तिघेजण एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरात वास्तव्यास होते. यामुळे त्यांनाही पोलिसांनी सहआरोपी करून अटक केली आहे. तसेच त्यांचा मोबाईल ही जप्त केला आहे. या प्रकरणात एमआयएमचे नेते इम्तीयाज जलील यांचा हात असून त्यांना देखील अटक करावी अशी मागणी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केली.

यानंतर आज खासदार असदुद्दीन ओवेसी हे आज संभाजीनगरमध्ये दाखल झाले आणि निदा खान हिची पाठराखण केली. ते म्हणाले, नाशिक धर्मांतरण प्रकरण हा द्वेष भावनेतून केला आहे. ज्याने हा गुन्हा दाखल केला आहे तो सत्ताधारी पक्षाचा आहे. तिच्यावर केवळ आरोप झाले म्हणून तिची मीडिया ट्रायल करून तिला दोषी ठरवण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. न्यायालय या मुलीला निर्दोष ठरवेल असा विश्वास असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला.

घरात बुरखा आणि धार्मिक पुस्तके सापडणे कधीपासून अवैध झाले? ओवेसींचा सवाल

TCS धर्मांतरण प्रकरणातील एफआयआर बघितल्यावर समजेल की, संबंधित मुलीच्या घरातून एक बुरखा, नकाब आणि एक धार्मिक पुस्तक मिळल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सगळ्या वस्तू आक्षेपार्ह कधीपासून झाल्या, असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला. याआधी दिल्ली पोलिसांनी अशाचप्रकारे काही मुलांना अटक केली होती. त्यांच्याकडे मिर्झा गालिबचे पुस्तक सापडले होते. कोर्टात ही बाब समोर आल्यानंतर त्या मुलांना सोडून देण्यात आले. अलाहाबाद कोर्टातही उर्दू शेर लिहिला म्हणून काहीजणांना अटक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावेळीही न्यायालयाने याबाबत सवाल उपस्थित केले होते.

त्यामुळे नाशिक धर्मांतरण प्रकरनाबाबतही न्यायालय निकाल देईल आणि ती मुलगी निर्दोष ठरेल, तिच्यावरील कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही, मुसलमान समाजातील शिक्षित मुलामुलीना त्रास देण्यासाठी हे सगळे केले जात आहे. पण कायदा आपल काम करेल, असा विश्वास यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

SCROLL FOR NEXT