Chandrashekhar Bawankule and Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

BJP Internal Politics: पहिली यादी जाहीर होताच भाजपमध्ये अंतर्गत कलह, या उमेदवारांच्या नावाला विरोध

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर होताच, पक्षात अंतर्गत कलह पाहायला मिळत आहे.

Satish Kengar

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. आपल्या पहिल्याच यादीत भाजपने ९० उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यातच भाजपने नाशिक पश्चिममधून सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला आता भाजपच्याच पदाधिकाऱ्यांकडून विरोध होत आहे. त्यांना उमेदवारी दिल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराज असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा हिरे याना उमेदवारी जाहीर झाल्यास काम न करण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला. मात्र आता त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांचा सीमा हिरे याना विरोध कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. हिरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता भाजप पदाधिकाऱ्यांनी उद्या महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

तिकीट न मिळाल्याने श्रीनाथ भिमाले नाराज?

पुण्यातील पर्वती विधानसभा मतदार संघात उमेदवारीवरून वाद निर्माण झाला आहे. येथून भाजपने माधुरी मिसाळ यांना तिकीट जाहीर केलं आहे. यानंतर आता तिकीट न मिळाल्याने श्रीनाथ भिमाले नाराज असल्याची चर्चा आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघातून श्रीनाथ भिमाले इच्छुक होते. मतदारसंघातील नागरिकांशी बोलून पुढचा निर्णय जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. यातच ते बंडखोरी करू शकतात, अशी चर्चा आहे.

हिंगोलीत ही कार्यकर्ते नाराज

दरम्यान, भाजपने हिंगोली विधानसभेसाठी विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांना चौथ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर होताच पदाधिकारीकडून बंडखोरीची शक्यता वारवाली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO

Mobile Tips: तुमचा फोन इतक्या लवकर खराब का होतो? जाणून घ्या कारणे आणि टिप्स

Maharashtra Live News Update : कोंढव्यात पोलिसांसोबत झालेल्या झटापटीनंतर ड्रग्स पेडलरचा मृत्यू

'लग्नापूर्वी मी कुणासोबत शरीरसंबंध आणि कुणासोबत नाही..' बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीचं स्टेटमेंट चर्चेत

SCROLL FOR NEXT