Kasba Bypoll Election: काँग्रेसमध्ये बंडखोरी! 'हे' इच्छुक उमेदवार उद्या कसबा मतदारसंघातून भरणार अर्ज

Kasba bypoll: काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पण आता पक्षासमोर बंडखोरीचं आव्हान उभं राहिलं आहे.
Rebellion challenge before Congress in Kasba
Rebellion challenge before Congress in KasbaSAAM TV
Published On

Pune Kasba Bypoll Election : पुण्यातील कसबा पोटनिवडणूक चांगलीच रंगदार बनली आहे. काँग्रेसकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची अनेकांना उत्सुकता होती. आज काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन देखील केले. पण आता काँग्रेससमोर बंडखोरीचं आव्हान उभं राहिलं आहे. (Latest Marath News)

Rebellion challenge before Congress in Kasba
Congress Andolan: मोदी नावाची व्यक्ती उभी करून RSS-भाजपने षडयंत्र रचलं; काँग्रेसचा गंभीर आरोप

काँग्रेसमध्ये बंडखोरी बाळासाहेब दभेकर यांनी बंडखोरीचा इशारा दिला असून, ते उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकजूट होऊन लढण्याचे आव्हान केले होते. परंतु आता दभेकर यांनी बंडखोरीचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता दभेकरांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश येत का हे पहावं लागेल.

Rebellion challenge before Congress in Kasba
Pune Bypoll: कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला! 'साम टीव्ही'च्या बातमीवर शिक्कामोर्तब

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसमधील इच्छुकांच्य यादीत दभेकर देखील होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुण्यात तळ ठोकून आहेत. त्यांनी इच्छुकांच्या अनेक बैठका देखील घेतल्या. त्यानंतरही दभेकरांनी बंडखोरीचा इशारा दिला आहे. त्यामुळे ते कसबा मतदारसंघात अर्ज भरणार की काँग्रेस त्यांची नाराजी दूर करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com