Maratha Andolan Saam tv
महाराष्ट्र

Maratha Andolan: आम्ही मनोज जरांगे यांना न्याय मिळेपर्यंत सोबत; अर्जुन खोतकरांनी मांडली सरकारची भूमिका

Maratha Andolan: आम्ही मनोज जरांगे यांना न्याय मिळेपर्यंत सोबत, अशी भूमिका अर्जुन खोतकरांनी भूमिका मांडली

लक्ष्मण सोळुंके

Arjun khotkar Latest News:

गेल्या १२ दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे आंदोलनाला बसले आहेत. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काल मुंबई सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीनंतर मराठा समाजाचे शिष्टमंडळ जालन्यात दाखल झालं. तसेच या बैठकीनंतर मनोज जरांगे काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, राज्य सरकारतर्फे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी अंतरवाली सराटी गावात सरकारची भूमिका मांडली. यावेळी आम्ही मनोज जरांगे यांना न्याय मिळेपर्यंत सोबत, अशी भूमिका अर्जुन खोतकरांनी भूमिका मांडली. (Latest Marathi News)

अंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी अर्जुन खोतकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सरकारची भूमिका मांडली. अर्जुन खोतकर म्हणाले, 'मनोज जरांगे पाटील जेवढे उपोषणामध्ये आहेत, तेवढाच मी देखील या उपोषणात आहे. या उपोषणाची भूमिका प्रभावीपणे मांडता यावी, अशी जबाबदारी माझ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली आहे'.

'मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केला, त्यामुळे जेव्हा जेव्हा आरक्षणाचा लढा उभा राहील, तेव्हा तेव्हा मनोज पाटील यांचा इतिहास उभा राहील. मराठा आरक्षणाचा अहवाल ११ दिवसात सादर करण्यात आला, परंतु तो हायकोर्टात गेला. त्या अहवालाबाबत हायकोर्टाने प्रश्न उपस्थित केला, असे ते म्हणाले.

'ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांच्या बाबत जरागे यांचा आग्रह होता. ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी वेळ मागितला आहे, असेही खोतकर म्हणाले.

'जो पर्यंत न्यायमूर्ती अंतिम निर्णय देत नाही, तो पर्यंत 2004 च्या जीआरची अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. जीआराबाबत जरागे पाटील यांनी आपली भूमिका मांडावी. सरकारने समिती नेमली, त्याबाबत काम करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, अशी माहिती अर्जुन खोतकर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार सतेज पाटील यांचा डान्स

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT