Arabian Sea Shiv Smarak Saam Digital
महाराष्ट्र

Arabian Sea Shiv Smarak : अरबी समुद्रात शिवस्मारकाचा संभाजीराजेंकडून शोध, जलपूजन झालेलं शिवस्मारक गेलं कुठं?

Chhatrapati Shivaji Maharaj Memorial : तब्बल 23 वर्षांपासून रखडलेलं शिवस्मारक शोधण्यासाठी संभाजीराजेंनी अरबी समुद्रात शोध मोहीम आयोजित केली होती. मात्र त्यांना स्मारक सापडेलं नाही.

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

प्रत्येक निवडणुकीआधी चर्चेत येणारा विषय म्हणजे अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक.... तब्बल 23 वर्षांपासून रखडलेलं शिवस्मारक शोधण्यासाठी स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजेंनी अरबी समुद्रात शोध मोहीम आयोजित केली होती. या शोध मोहीमेवरचा हा स्पेशल रिपोर्ट....

संभाजीराजे दुर्बिणीतून शोध घेत आहेत त्याच ठिकाणी शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं. तब्बल 8 वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारुढ स्मारक उभं राहिलं नाही. त्यावरून संभाजीराजेंनी संताप व्यक्त केला. तर सरदार पटेलांचं स्मारक अवघ्या 2 वर्षात पूर्ण झालं. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक का नाही? असा सवालच संभाजीराजे छत्रपतींनी केलाय... तर शिवस्मारकावर स्थगिती आणण्यासाठी फडणवीसांनी विरोधकांना जबाबदार धरलंय..

जलपूजनानंतर 8 वर्षे झाले तरी शिवस्मारक अजून तयार न झाल्याने संभाजीराजेंसह कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. तर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केल्याने संभाजीराजेंनी पोलिसांना इशाराच दिला.24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन केलं होतं. मात्र शिवस्मारक फक्त 8 वर्षापासूनच नाही तर तब्बल 23 वर्षापासून रखडलंय...ते नेमकं कसं? पाहूयात...

शिवस्मारक गेलं कुठे?

2004 सुशीलकुमार शिंदेंकडून अरबी समुद्रात शिवस्मारकाची घोषणा

2009 काँग्रेसच्या जाहीरनाम्यात शिवस्मारकाचा पुन्हा उल्लेख

मच्छिमारांचा विरोध, पर्यावरण वाद्यांकडून उच्च न्यायालयात याचिका

2014 फडणवीसांकडून परवानग्या मिळवत शिवस्मारकाची घोषणा

2016 शिवस्मारकासाठी पंतप्रधान मोदींच्या हस्ते जलपूजन

2019 देबी गोयंकाच्या याचिकेनुसार शिवस्मारकाचे काम थांबवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

2024 शिवस्मारकावर सुनावणी अद्याप प्रलंबित

23 वर्षापासून रखडलेलं शिवस्मारक नेमकं कसं असणार?

अश्वारुढ शिवस्मारकाची उंची - 212 मीटर

नरिमन पॉईंटपासून 5.1 किमी अंतरावर

16.86 हेक्टरवर शिवस्मारक

जलदुर्गाला साजेशी स्मारकाची भिंत

स्मारकाच्या प्रवेशद्वारावर तुळजा भवानीचे मंदिर

स्मारकात शिवकालीन प्रसंगांचे देखावे

स्मारकात जेट्टी, हेलिपॅड, स्मारकाची तटबंदी, रेस्टॉरंट, हॉस्पिटल

शिवस्मारकासाठी अंदाजित खर्च- 3,600 कोटी

तब्बल 23 वर्षापासून प्रत्येक निवडणुकीवेळी शिवस्मारकाचा मुद्दा ऐरणीवर येतो. सध्या शिवस्मारकाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. मात्र पंतप्रधानांनी जलपूजन केल्यानंतरही शिवस्मारकाची एकही वीट रचली गेली नसल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजीची लाट उसळलीय. त्यामुळे आता शिवप्रेमींच्या नाराजीची लाट महायुतीला बुडवणार की महायुती राजकीय कसब वापरून लाटेतून मार्ग काढणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT