Beed Land Scam: बीड जमीन घोटाळा प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed Land Scam: बीड जमीन घोटाळा प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

बीडच्या नित्रुड येथील मस्जिदची 44 एक्कर 8 गुंठे जमीन हडपली.

विनोद जिरे

बीड: बीड (Beed) जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात देवस्थान आणि वक्फ बोर्डच्या जमीनी, भूखंड माफियांनी आपल्या घशात घातल्या असून हेच भूखंड माफियांचे कारनामे, साम टिव्हीने सर्वात अगोदर समोर आणले होते. त्याचा पाठपुरावा देखील साम टीव्ही गेल्या अनेक दिवसांपासून करत आहे. त्यानंतर आता बीड (Beed) जिल्ह्यात एक- एक कारवाईला सुरुवात झाली आहे. बीडच्या दिंद्रुड पोलीस (Police) ठाण्यामध्ये, 44 एक्कर 8 गुंठे वक्फ बोर्डाची जमीन हडपल्या प्रकरणी, तत्कालीन उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) अभिमन्यू बोधवड याच्यासह कुटुंबातील (family) भाऊ, पत्नी, बहीण अशा एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. (Another case filed in Beed land scam case)

हे देखील पहा-

जिल्हा वक्फ बोर्ड अधिकारी अमीनुजमा खलीखुजमा सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीत सांगितले आहे की, बीडच्या माजलगाव (Majalgaon) तालुक्यातील नित्रुड येथे, मस्जितीची आणि वक्फ बोर्डच्या मालकीची, इनाम जमीन सर्व्हे नंबर 36, 37 मध्ये क्षेत्र 44 एकर 8 गुंठे आहे. त्याची नोंद महाराष्ट्र राजपत्रात, 14 फेब्रुवारी 1974 अन्वेय नोंद असून महसुल अभिलेखात खीदमत मास इनाम जमीन म्हणून नोंद आहे. असे असतानाही तत्कालीन उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी, बेकायदेशीररित्या हैद्राबाद इनाम निर्मुलन कायद्यांतर्गत खालसा केली. आरोपींनी (accused) तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वक्फ बोर्ड यांचे बनावट नाहरकत प्रमाणपत्र (Certificate) बनवून, खिदमत माश इनाम जमीन खरेदी विक्री करण्यात आली.

तसेच फेरफारमध्ये स्वतः च्या नावे नोंद करुन घेतली. या प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड याच्यासह प्रदिप विश्वनाथ आघाव, बिभिषन रंगनाथ बोधवड, रंगनाथ बोधवड, अनुसया विश्वनाथ निरडे, शितल गणेश इरमले, स्नेहल अभिमन्यु बोधवड, सय्यद रज्जाक सय्यद जाफर, सय्यद रईस सय्यद जाफर, प्रशांत उत्तमराव तोष्णीवाल यांच्यावर दिंद्रुड पोलीस ठाण्यात कलम 420, 406, 467, 468, 471, 447, 448, 120 (ब), 34, 409 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

SCROLL FOR NEXT