Nitin Gadkari: तो रस्ता करुन दाखवाच; अनामिक तरुणाचे गडकरींना 'ओपन चॅलेंज' अॅड. जयेश गावंडे
महाराष्ट्र

Nitin Gadkari: 'तो' रस्ता करुन दाखवाच; अनामिक तरुणाचे गडकरींना 'ओपन चॅलेंज'

Nitin Gadkari भारतातील एकमेव असे मंत्री आहेत की ज्यांच्यामध्ये काही तरी करून दाखवण्याची धमक आहे त्यांनी तालुक्यातील रस्त्यांकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी या Video मधून करण्यात आली आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या सर्वच प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सामान्य नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून या खराब रस्त्यांची दखल घ्यावी अशी मागणी करत आहेत. असाच एक Video सध्या सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल झाला आहे. खराब रस्त्याला कंटाळून एका अनामिक इसमाने नाव न जाहिर करता मास्क परिधान करून या रस्त्यांच्या समस्या बद्दल एक व्हिडिओ तयार केला आहे.

या व्हिडिओमध्ये या अनामिक युवकाने चक्क रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांना एक प्रकारे खुले चॅलेंज दिले आहे. गडकरी यांनी तेल्हारा तालुक्यातील रस्ते चांगले करून दाखवण्याचे चॅलेंज स्वीकारावे. कारण भारतातील ते एकमेव असे मंत्री आहेत की ते काही करून दाखवण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे त्यांनी तालुक्यातील रस्त्यांकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी या व्हिडिओ मधून करण्यात आली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral) होत असून हा व्हिडिओ कोणी बनवला याबाबत अनभिज्ञता असून बनविणाऱ्याने आपला परिचय दिलेला नाही. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना खराब स्त्याची ही बाब निदर्शनास आणून देणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांपासून तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. तर चार वर्षांपासून सदर रस्ते खोदून ठेवलेले आहेत.

हे देखील पहा -

या रस्त्यामुळे अनेक जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे तर कित्येक जण जखमी झालेले आहेत काही गर्भवती महिलांची रस्त्यातच प्रसूती झाल्याच्या धक्कादायक घटना सुद्धा घडल्या आहेत. तर धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. या रस्त्यांवर हजारो नवीन वाहने सुद्धा खिळखिळी झाली आहेत आणि लक्षावधी रुपयांचा भुर्दंड सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे.

निष्क्रिय लोकप्रतिनिधी, निगरगट्ट प्रशासन, आणि सहनशीलतेची परिसीमा गाठलेली सुस्त जनता हे सर्व याला कारणीभूत असल्याचे बोलले जाते. या रस्त्यांसाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली अनेकदा उपोषण झाले अनेक अभिनव आंदोलन सुद्धा केले गेले परंतु उदासिनतेचा कळस गाठलेल्या लोकप्रतिनिधींना याच्याशी काही घेणेदेणे नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता केंद्रीय रस्ते मंत्री नितिन गडकरी हे ओपन चॅलेंज (Open Challenge) स्वीकारतात का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सुवर्णनगरीत सोन्याने उच्चांक गाठला; दसऱ्याआधी १०५० रुपयांची वाढ; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 29,327 हेक्टर क्षेत्रावर नुकसान

Hug Benefits : पार्टनरला जादूची झप्पी मारा अन् रिलॅक्स व्हा... वाचा फायदे

Palghar : खड्ड्यामुळे बस सेवा बंद; शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट

Tandalachi kheer: दसऱ्याला बनवा काहीतरी गोडधोड,तांदळाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT