अंनिस Saam TV
महाराष्ट्र

नंदी दूध पीत असल्याचे सिद्ध करणाऱ्यास ७ कोटी २५ लाखांचे बक्षीस, अंनिसची घोषणा

महाशिवरात्री पार पडली असून शनिवारपासून एक प्रकार समोर आला. राज्यासह देशातील अनेक राज्यात महादेव मंदिरातील नंदीची मूर्ती पाणी पीत असल्याची माहिती सर्वत्र पसरली.

संजय जाधव

बुलडाणा : श्रद्धेच्या बळावर जग जिंकता येऊ शकेल, असे म्हटले जाते. गणपती दूध पितो, नंदी पाणी पितो अशा घटना अधूनमधून कुठे ना कुठे घडतच असतात. एकाच दिवशी देशाच्या अनेक भागात महादेव मंदिरातील नंदीची मूर्ती पाणी पित असल्याची चर्चा सोशल मीडिया माध्यमातून पसरली आणि मग काय सर्वत्र मंदिरात गर्दी झाली. बुलढाणा जिल्ह्यातही (Buldhana) या बातमीचे लोन पसरले आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी नागरिकांनी तसा प्रयत्न केला असून नंदी पाणी आणि दूध पीत असल्याची जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नंदी दूध किंवा पाणी पिट असल्याच्चे सिद्ध करून दाखविल्यास ७ कोटी २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

श्रद्धेच्या जगात भक्तिभावसोबतच अंधश्रद्धा देखील मोठ्या आहेत. दरवर्षी कुठे ना कुठे काही ना काही चर्चा होतच असते. कधी गणपती दूध पितो तर कधी नंदी पाणी पितो, कुठे दगड गोल फिरतो तर कुठे मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू, कुंकू बाहेर पडते असे प्रकार समोर येत असतात. प्रत्येकवेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून या प्रकारांचे खंडन केले जाते आणि त्याला विज्ञानाची जोड देण्यात येत असते. नुकतेच महाशिवरात्री पार पडली असून शनिवारी असाच एक प्रकार समोर आला. राज्यासह देशातील अनेक राज्यात महादेव मंदिरातील नंदीची मूर्ती पाणी पीत असल्याची माहिती सर्वत्र पसरली.

हे देखील पहा -

यामध्ये शेगाव, खामगाव, मलकापूर, नांदुरा आणि बुलढाणा शहरातील अनेक मंदिरात हा प्रकार सुरु झाला. नंदीच्या मूर्तीला काही भाविकांनी चमच्याच्या साहाय्याने पाणी आणि दूध पाजून पाहिले. एक-एक करता सर्वांच्याच हाताने नंदी पाणी आणि दूध पिऊ लागला. बघता-बघता भाविकांच्या रांगा लागल्या. घरून ग्लास, तांबे घेऊन लोक मंदिरात येऊ लागले. भगवान महादेवांच्या नावाचा जयघोष करीत नंदीला पाणी पाजू लागले. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी असे प्रकार घडले. काहींनी हा प्रकार अंधश्रद्धा समजला तर काहींनी श्रद्धा समजून इतरांना देखील कळविले.

दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत सांगितले कि, नंदी किंवा गणपती कधीच पाणी, दूध पित नसतो. वैज्ञानिकदृष्ट्या पाण्याच्या पृष्टीय ताणाच्या अप्रभावामुळे हा प्रकार घडत असतो. पाणी आणि मूर्ती या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्याने त्या काहीश्या आकर्षित होऊ शकतात. एखादा साधा दगड देखील १ किंवा २ थेंब पाणी आतमध्ये घेऊ शकतो. सोशल मीडियाचा (Social Media) गैरवापर करीत ही अफवा पसरवली जात असून नागरिकांच्या श्रद्धेचा उपयोग केला जात आहे. नंदी पाणी पितो असे कुणी सिद्ध केल्यास त्याला २१ लाखांचे बक्षीस देण्यात येईल, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रवक्त्या किशोर वाघ यांनी स्पष्ट केले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT