anna hajare on munde and kokate  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर आरोप झाले तर त्यांनी राजीनामा द्यावा! अण्णा हजारे यांचा सल्ला

Anna Hazare Demands Resignation from Ministers: जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाव न घेता मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली

Saam Tv

अहिल्यानगर: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने नवनवीन आरोप होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच, कालच न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.मंत्री धनंजय मुंडेच्या बाबतीत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या रोज नवनवीन खुलासे करत आहेत. तर मुंडे हे कृषि मंत्री असताना त्यांनी कृषि खात्यात अनेक घोटाळे केले आहे असे आरोप आमदार सुरेश धस वारंवार करताना दिसत आहे.विरोधी पक्षासाह महायुतीतले देखील काही नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

या सर्व प्रकरणावर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप होत असताना त्यांनी जबाबदारी म्हणून तत्काळ राजीनामा द्यावा, असे मत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी कोणाचेही नाव न घेता धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर अप्रत्यक्षपणे प्रहार केला आहे.

राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने नवनवीन आरोप होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच, न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मंत्रीमंडळातील मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले असतील, तर त्यांनी जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा. त्यामुळे त्यांची प्रतिमा अधिक स्वच्छ राहते आणि जनतेत योग्य संदेश जातो. आपणच चुकीच्या वाटेने गेलो, तर जनता कुठे जाणार?

ते पुढे म्हणाले की, अशा व्यक्तींना मंत्रीमंडळात घेताना सरकारने विचार करणे आवश्यक आहे. मंत्र्यांचे चारित्र्य आणि नैतिकता महत्त्वाची असते. सुरुवातीला लहान चुकीकडे दुर्लक्ष केले जाते, मात्र नंतर त्याच चुकीचे गंभीर परिणाम होतात आणि संपूर्ण समाज, राज्य आणि देशाचे नुकसान होते. त्यामुळे अशा घटनांवर सरकारने गांभीर्याने विचार करावा, असे अण्णा हजारे यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT